शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
3
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
4
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
5
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
6
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
7
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
8
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
9
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
10
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
11
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
12
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
13
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
14
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
15
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
16
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
17
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
18
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
19
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
20
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळा सुरू झाल्यावर आली खड्ड्यांची आठवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:08 IST

महापौरांनी घेतली बैठक : नगरसेवकांच्या समन्वयाने कामे करण्याचे निर्देश लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूर शहरातील मुख्य मार्ग तसेच ...

महापौरांनी घेतली बैठक : नगरसेवकांच्या समन्वयाने कामे करण्याचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नागपूर शहरातील मुख्य मार्ग तसेच अंतर्गत मार्गावर असलेले खड्डे पावसाळा सुरू होण्यापूर्वी बुजवणे अपेक्षित होते. परंतु मनपा प्रशासन व पदाधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. आता पावसाला सुरुवात होताच नागरिकांचा त्रास वाढला. पावसाला सुरुवार होऊन १५ दिवस झाल्यानंतर महापौर दयाशंकर तिवारी यांना बुधवारी शहरातील खड्ड्यासंदर्भात बैठक घेतली. प्रशासनाला धारेवर धरत सर्व रस्त्यांवरील सर्व खड्डे तातडीने बुजवून बुजविण्यात आलेल्या खड्ड्यांच्या माहितीचा रोडच्या नावानुसार अहवाल येत्या सात दिवसात सादर करण्याचे निर्देश दिले.

मनपा मुखयालयात आयोजित बैठकीला उपमहापौर मनीषा धावडे, स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर, सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, स्थापत्य समिती सभापती राजेंद्र सोनकुसरे, अग्निशमन व विद्युत समिती सभापती दीपक चौधरी, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, माजी सत्तापक्ष नेता संदीप जाधव, नगरसेवक विजय झलके, अधीक्षक अभियंता अजय पोहेकर, कार्यकारी अभियंता सोनाली चव्हाण, आदी उपस्थित होते.

महापौरांनी सर्व झोनमधील खड्ड्यांची माहिती आणि त्यासंदर्भात प्रशासनाकडून सुरू असलेल्या कार्यवाहीचा आढावा घेतला. शहरात ज्या रस्त्यावर खड्डे आढळतात ते बुजविण्याचे काम हॉटमिक्स विभागांतर्गत केले जातात. यासाठी एजन्सी सुद्धा नियुक्त करण्यात आलेली आहे. हॉटमिक्स विभागाव्यतिरिक्त मनपाच्या वार्षिक अंदाजपत्रकामध्ये झोनला खड्डे बुजविण्यासाठी पाच लाखाचा निधी निर्धारित करण्यात आलेला आहे. सर्व सहायक आयुक्तांनी त्यांच्या झोनमधील सर्व नगरसेवकांना पत्र पाठवून त्यांच्याकडून खड्ड्यांबाबत तक्रारी मागवून घ्याव्यात. त्या तक्रारींवर झोन स्तरावर तोडगा निघत असल्यास झोन निधीचा वापर करून ते खड्डे बुजविण्याचे निर्देश दिले. विजय झलके यांनी ज्या शासकीय विभागाकडून खड्डे बुजविले गेले नाही त्यांना माहिती देण्याची सूचना केली.

...

तर कंत्राटदार काळ्या यादीत

अनेक ठिकाणी सिमेंट रोडचे काम झालेले आहे. मात्र दोन रस्त्यांच्या मधील इंटरलॉकिंग करण्यात आलेले नाही. त्यामुळे अपघाताचा मोठा धोका निर्माण होत आहे. अशा स्वरूपाचे अर्धवट कामे करून बिल सादर करणाऱ्या कंत्राटरांना काळ्या यादीत का टाकू नये, असा नोटीस देण्याचे आदेश दिले. आदेशानंतर खड्डे बुजविलेले न आढळल्यास संबंधित एजन्सीवरही कारवाई करण्याचे निर्देश महापौरांनी दिले.

....

लसीकरण केंद्रांजळील खड्डे बुजवा

शहरात १८ वर्षावरील लसीकरणाला सुरुवात झाली आहे. यासाठी लसीकरण केंद्रांकडे जाणाऱ्या मार्गांवर जाणाऱ्या वाहनांची संख्या सुद्धा वाढली आहे. या मार्गांवर असलेल्या खड्ड्यांमुळे कुठलाही धोका निर्माण होऊ नये याकरिता प्राधान्याने लसीकरण केंद्रांच्या मार्गावरील खड्डे बुजविण्याचे निर्देशही महापौर यांनी दिले आहे.