शहरं
Join us  
Trending Stories
1
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
2
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
3
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
4
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
5
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
6
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
7
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
8
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
9
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
10
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
11
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
12
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
13
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
14
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
15
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
16
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
17
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

‘मॅगी’वर बंदी केव्हा?

By admin | Updated: June 3, 2015 02:34 IST

महिन्यानंतरही अहवाल प्रलंबित नागपूर : अन्न प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मुंबई, पुणे आणि नागपुरातून घेतलेल्या मॅगीच्या नमुन्याचा अहवाल ...

महिन्यानंतरही अहवाल प्रलंबित नागपूर : अन्न प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मुंबई, पुणे आणि नागपुरातून घेतलेल्या मॅगीच्या नमुन्याचा अहवाल पुणे येथील प्रयोगशाळेने महिन्यानंतरही न दिल्याने ‘मॅगी’वर बंदी येणार वा नाही, यावर लोकांमध्ये संभ्रम आहे. हानीकारक पदार्थ आढळल्यास नागपुरात ‘मॅगी’वर तातडीने बंदी टाकण्याचे सूतोवाच अन्न प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी लोकमतशी बोलताना केले. पण सर्वकाही अहवालावर अवलंबून आहे. मुंबई येथील मॅगीचे सहा नमुने, पुणे येथून दोन आणि नागपुरातून एक नमुना २ मे रोजी पुणे येथील शासकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आला. १४ दिवसांत अहवाल देणे कायद्याने बंधनकारक आहे. पण महिन्यानंतरही प्रयोगशाळेने अहवाल पाठविला नाही. एखाद्या संवेदनशील प्रकरणात तपासणी अहवाल तातडीने देण्याची गरज आहे. अहवालाला उशीर होत असल्यामुळे शासकीय प्रयोगशाळेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. उत्तर प्रदेशात मॅगीच्या नमुन्यात शिसे व मोनो सोडियम ग्लुटामेट (अजिनोमोटोया) या हानीकारक पदार्थांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आढळल्यानंतर मॅगीची जाहिरात करणाऱ्या तारे-तारकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुझफ्फरपूर येथील न्यायालयाने दिले आहेत. आता इतर राज्यातही मॅगीचे नमुने तपासण्यात येत आहेत. सध्या नागपुरात मॅगीची विक्री सुरू आहे. कंपनीच्या वितरकांचे प्रतिनिधी प्रत्येक दुकानात मॅगीचा पुरवठा करीत आहे. ग्राहकांची मागणी असल्याने विक्री करीत असल्याचे काही दुकानदारांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. (प्रतिनिधी)