‘मॅगी’वर बंदी केव्हा?

By Admin | Updated: June 3, 2015 02:34 IST2015-06-03T02:34:18+5:302015-06-03T02:34:18+5:30

महिन्यानंतरही अहवाल प्रलंबित नागपूर : अन्न प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मुंबई, पुणे आणि नागपुरातून घेतलेल्या मॅगीच्या नमुन्याचा अहवाल ...

When is Maggi ban? | ‘मॅगी’वर बंदी केव्हा?

‘मॅगी’वर बंदी केव्हा?


महिन्यानंतरही अहवाल प्रलंबित नागपूर : अन्न प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मुंबई, पुणे आणि नागपुरातून घेतलेल्या मॅगीच्या नमुन्याचा अहवाल पुणे येथील प्रयोगशाळेने महिन्यानंतरही न दिल्याने ‘मॅगी’वर बंदी येणार वा नाही, यावर लोकांमध्ये संभ्रम आहे.
हानीकारक पदार्थ आढळल्यास नागपुरात ‘मॅगी’वर तातडीने बंदी टाकण्याचे सूतोवाच अन्न प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी लोकमतशी बोलताना केले. पण सर्वकाही अहवालावर अवलंबून आहे. मुंबई येथील मॅगीचे सहा नमुने, पुणे येथून दोन आणि नागपुरातून एक नमुना २ मे रोजी पुणे येथील शासकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आला. १४ दिवसांत अहवाल देणे कायद्याने बंधनकारक आहे. पण महिन्यानंतरही प्रयोगशाळेने अहवाल पाठविला नाही. एखाद्या संवेदनशील प्रकरणात तपासणी अहवाल तातडीने देण्याची गरज आहे. अहवालाला उशीर होत असल्यामुळे शासकीय प्रयोगशाळेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. उत्तर प्रदेशात मॅगीच्या नमुन्यात शिसे व मोनो सोडियम ग्लुटामेट (अजिनोमोटोया) या हानीकारक पदार्थांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आढळल्यानंतर मॅगीची जाहिरात करणाऱ्या तारे-तारकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुझफ्फरपूर येथील न्यायालयाने दिले आहेत. आता इतर राज्यातही मॅगीचे नमुने तपासण्यात येत आहेत.
सध्या नागपुरात मॅगीची विक्री सुरू आहे. कंपनीच्या वितरकांचे प्रतिनिधी प्रत्येक दुकानात मॅगीचा पुरवठा करीत आहे. ग्राहकांची मागणी असल्याने विक्री करीत असल्याचे काही दुकानदारांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: When is Maggi ban?