शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
2
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
3
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
4
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
5
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
6
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
7
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
8
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
9
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
10
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
11
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
12
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
13
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
14
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
15
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
16
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
17
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
18
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
19
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
20
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

चौकशी पूर्ण होताच न्यायालयात आरोपपत्र

By admin | Updated: January 15, 2017 02:07 IST

तुली पब्लिक स्कूलच्या वसतिगृहातील आदिवासी समाजातील विद्यार्थिनींच्या शोषण प्रकरणाचा तपास

तुली पब्लिक स्कूल प्रकरण : दहा दिवसात तपास पूर्ण होण्याची शक्यता नागपूर : तुली पब्लिक स्कूलच्या वसतिगृहातील आदिवासी समाजातील विद्यार्थिनींच्या शोषण प्रकरणाचा तपास करीत असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना हे प्रकरण गंभीर असल्याचे दिसून आले आहे. यामुळे पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करीत आहे. येत्या १० दिवसात तपास पूर्ण होण्याची शक्यता असून तपास पूर्ण होताच न्यायालयात आरोपपत्र (चार्जशीट) दाखल करण्यात येईल, असा दावा एसीपी आर. तायवाडे यांनी केला आहे. लोकमतला मिळालेल्या माहितीनुसार हे प्रकरण उघडकीस आल्यावर पोलिसांनी आरोपी आचाऱ्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली होती. तेव्हा आचाऱ्याने शोषणाबाबत नकार दिला होता. परंतु पोलिसांना त्याच्या बोलण्यावर विश्वास बसला नाही. सूत्रांनुसार या प्रकरणाचा तपास करीत असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना विद्यार्थिनींची तक्रार खरी असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे विचारपूस करण्यासाठी शाळा व वसतिगृहातील इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही बोलावण्यात येऊ शकते. सर्वांचे बयान नोंदविल्यावर न्यायाालयात आरोपपत्र दाखल केले जाईल. या प्रकरणाचा तपास जरीपटका पोलीस ठाण्याचे एसीपी आर. तायवाडे हे करीत आहेत. यासंदर्भात त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, विद्यार्थिनींची विचारपूस झाली आहे. यादरम्यान त्यांनी ज्या काही गोष्टी सांगितल्या त्यात तथ्य असल्याचे दिसून येते. आरोपीचीही विचारपूस झाली आहे. सखोल चौकशी केल्यावर आरोपपत्र दाखल केले जाईल. वसतिगृहातील आदिवासी विद्यार्थिनींच्या शोषणप्रकरणी पोलिसांनी शाळा व्यवस्थापन आणि प्रशासनाच्या विरोधात अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सोबतच आदिवासी विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त एस. डब्ल्यू. सावरकर यांनी वसतिगृहाला भेट देऊन तुली पब्लिक स्कूलला कारणेदाखवा नोटीस बजावली आहे. यासंदर्भातील माहिती विभागाला देण्याऐवजी लपवून ठेवण्यात आल्याबाबत ही नोटीस बजावण्यात आली आहे. या नोटीसनंतर आदिवासी विभागाकडूनही चौकशी केली जात आहे. दुसरीकडे हे प्रकरण दाबण्याचे पूर्ण प्रयत्न सुरू आहेत. घटनेपासूनच पालकांना या प्रकरणात तोंड न उघडण्याची ताकीद देण्यात आलेली आहे.(प्रतिनिधी)