शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
4
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
5
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
6
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
7
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
8
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
9
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
10
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
11
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
12
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
13
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
14
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
15
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
18
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
19
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
20
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
Daily Top 2Weekly Top 5

लोकोपायलटची घर वापसी कधी ?

By admin | Updated: June 1, 2015 02:41 IST

सहा महिन्यासाठी भुसावळ डिव्हीजनला पाठविलेले लोकोपायलट तीन वर्षे होऊनही नागपूर विभागात परतले नाहीत.

कामाचा ताण वाढला : सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णयदयानंद पाईकराव  नागपूर सहा महिन्यासाठी भुसावळ डिव्हीजनला पाठविलेले लोकोपायलट तीन वर्षे होऊनही नागपूर विभागात परतले नाहीत. यामुळे नागपूर विभागात २५० लोकोपायलटची पदे रिक्त झाली असून कार्यरत लोकोपायलटवर कामाचा ताण वाढला आहे. त्यांना सुट्या मिळणे बंद होऊन, ओव्हरटाईम करावा लागत आहे. याचा परिणाम सुरक्षेवर होत असून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून भुसावळला पाठविलेले लोकोपायलट त्वरित परत बोलविण्याची मागणी होत आहे.मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील १२७ लोकोपायलट जून २०१२ मध्ये ६ महिन्यांच्या कालावधीसाठी भुसावळ विभागात पाठविण्यात आले. परंतू जून २०१५ पर्यंत हे लोकोपायलट भुसावळ विभागाने नागपूर विभागाला परत केले नाहीत. सध्या नागपूर विभागात २५० लोकोपायलटची पदे रिक्त झालेली आहेत. यामुळे सुरक्षेवर प्रश्नचिन्ह लागले आहे. यामुळे एखाद्या लोकोपायलटच्या हातून अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने भुसावळला पाठविलेले लोकोपायलट परत बोलविण्यासाठी त्वरित उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. गार्डची पदेही रिक्तचविभागात गार्डची एकून ५६० मंजूर पदे असून त्यातील ११० पदे रिक्त आहेत. त्यामुळे गार्डला सुट्या मिळत नसून त्यांनाही लोकोपायलटप्रमाणे ओव्हरटाईम करावा लागत आहे. रेल्वे प्रवासात लोकोपायलटप्रमाणे गार्डचे महत्त्वही खूप आहे. परंतु गार्डची पदेही रिक्त असल्यामुळे ही पदे त्वरीत भरण्याची गरज निर्माण झाली आहे.अधिकाऱ्यांची पदे भरतात त्वरितमध्य रेल्वेच्या नागपूर विभागात एकाही अधिकाऱ्याचे पद रिक्त नाही. एका अधिकाऱ्याचे पद रिक्त असले की त्याच्या कामाचा चार्ज दुसऱ्या अधिकाऱ्यावर येतो. त्यामुळे अधिकाऱ्याचे पद रिक्त असले की ते पद भरण्याला त्वरित प्राधान्य देण्यात येते. परंतु कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्याची तसदी कोणीच घेताना दिसत नाही.