शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
2
इराण युद्धात ट्रम्पना साथ न देणं युरोपला पडलं महागात; लादलं २५ टक्के टॅरिफ, व्यवसायाला मोठा झटका
3
पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार
4
तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा
5
Missing Link झाला मिसिंग, अभिजीत पानसेंचा टोला; पुण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक कोंडीत अडकले
6
मेहुण्याचा अपघाती मृत्यू, तर भावोजींनी त्याच ठिकाणी संपवलं आयुष्य;पालघरमध्ये थरकाप उडवणारी घटना
7
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
8
'जो करेल जातीची बात, त्याला मारेन जोरात लाथ', भर कार्यक्रमात नितीन गडकरींचं सूचक विधान
9
Jabalpur Cruise Accident : लाईफ जॅकेट असूनही आई-मुलगा बुडालेच कसे? जबलपूर क्रूझ दुर्घटनेबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा
10
चहा पिण्याची सर्वात योग्य वेळ कोणती? 'या' टाईमला म्हटलं जातं गोल्डन अवर
11
Gold Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीत जोरदार तेजी; चेक करा नवे दर
12
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
13
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
14
दोन सख्ख्या बहिणींशी लग्न करणाऱ्या भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू; शॉपिंगवरून झालेल्या वादाचा भयानक शेवट?
15
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
16
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
17
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
18
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
19
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
20
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
Daily Top 2Weekly Top 5

-तर कशी होईल स्मार्ट सिटी!

By admin | Updated: April 29, 2016 02:55 IST

सार्वजनिक व खासगी जागांवर अवैध पोस्टर, बॅनरच्या माध्यमातून जाहिरात करून मालमत्तांचे विद्रुपीकरण केले जाते.

महापालिकेकडून अंमलबजावणी नाही : विद्र्रुपीकरण रोखण्याची जबाबदारी झोन कार्यालयांचीनागपूर : सार्वजनिक व खासगी जागांवर अवैध पोस्टर, बॅनरच्या माध्यमातून जाहिरात करून मालमत्तांचे विद्रुपीकरण केले जाते. अशा प्रकाराला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सरकारने १९९५ साली सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंध कायदा अंमलात आणला. या कायद्यात मालमत्ता विद्रूप करणाऱ्यांना दंड व कारावासाची शिक्षा करण्याची तरतूद आहे. परंतु महापालिका प्रशासनाकडून या कायद्याची अंमलबजावणी केली जात नसल्याचे चित्र आहे. कायद्याचीच अंमलबजावणी होत नसल्याने उपराजधानी स्मार्ट सिटी कशी होईल, असा प्रश्न निर्माण झाला आहे.सार्वजनिक व खासगी जागांचा प्रचारासाठी वापर करण्याची प्रवृत्ती दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे सार्वजनिक स्थळांचे सौंदर्य व महत्त्व नष्ट होत असल्याबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी होत्या. याची दखल घेत २१ मार्च १९९५ रोजी राज्य सरकारने हा कायदा केला होता. कायद्यानुसार तीन महिने कारावासाची शिक्षा किंवा दोन हजार रुपये दंड अथवा एकाचवेळी दंड व शिक्षा तरतूद आहे. कायद्यानुसार कोणत्याही स्वरूपाचे बॅनर, पोस्टर सार्वजनिक अथवा खासगी जागेवर लावावयाचे असेल तर त्यासाठी महापालिका प्रशासनाची अनुमती घेणे आवश्यक असते. परंतु शहरात या कायद्याची अंमलबजावणी होत नसल्याने शहरातील चौक, शासकीय व निमशासकीय कार्यालये, रस्ते, सार्वजनिक व खासगी भिंती यावर पोस्टर, बॅनर चिपकवून व मजकूर लिहिल्याने विद्रूप केलेल्या आहेत. स्वच्छ व सुंदर शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपूर शहराची वाटचाल स्मार्ट सिटीच्या दिशेने सुरू आहे. यासाठी प्रयत्न सुरू असल्याचा दावा केला जात असतानाच, प्रशासनाचे शहराच्या विद्रुपीकरणाकडे मात्र दुर्लक्ष आहे. विद्रुपीकरणाला आळा घालण्याची जबाबदारी महापालिकेच्या झोनस्तरावरील सहायक आयुक्तांची आहे. परंतु ही जबाबदारी पार पाडत नसल्याचे चित्र आहे.(प्रतिनिधी)