शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
4
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
5
म्हशीला रेबीज, ३० जणांना टोचावे लागले इंजेक्शन! प्रकरण ऐकाल तर हादरून जाल
6
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
7
उन्हाळ्यात किचनमध्ये काम करताना नुसत्या घामाच्या धारा; 'असं' ठेवा स्वत:ला थंड थंड कूल कूल
8
अर्जुन तेंडुलकर आणि वैभव सूर्यवंशी यांच्यातील फिल्डबाहेरची खास गोष्ट; कमाईच्या बाबतीत कोण भारी?
9
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
10
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
11
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
12
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
13
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
14
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
15
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
16
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
17
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
18
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
19
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

चर्चेमागचे नेमके ‘लॉजिक’ काय?

By admin | Updated: July 9, 2015 02:58 IST

‘एमकेसीएल’सोबत बैठकीनंतर पेच आणखी वाढलानागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा पूर्ण कारभार पारदर्शक राहील,

नागपूर विद्यापीठ : ‘एमकेसीएल’सोबत बैठकीनंतर पेच आणखी वाढलानागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा पूर्ण कारभार पारदर्शक राहील, असा दावा कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी केला होता. परंतु प्रत्यक्षात मात्र विद्यार्थी हितांच्या बाबीमध्येदेखील कमालीची गुप्तता बाळगण्यात येत आहे. ‘एमकेसीएल’सोबत बुधवारी ‘दूध का दूध, पानी का पानी‘ होईल असा कुलगुरूंचा दावा गुरुवारी झालेल्या चर्चेनंतर पार हवेत विरुन गेला. या बैठकीत नेमके काय झाले याबाबत त्यांनी मौन साधले आहे. दुसरीकडे विद्यापीठाने सादर केलेल्या अटी ‘एमकेसीएल’ला मान्य नसल्याने हा सामंजस्य करार टिकण्यासंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. एका वेगळ््या कंपनीला सर्व कंत्राट देण्यासाठी हे सर्व करण्यात येत असल्याचे ‘लॉजिक’ सूत्रांनी मांडले आहे.‘एमकेसीएल’ची सुमारे पावणेचार कोटी रुपयांची देयके थकीत आहेत. हा वाद निवळावा यासाठी ‘एमकेसीएल’चे अधिकारी बुधवारी चर्चेसाठी विद्यापीठात आले होते. चर्चेदरम्यान काही रक्कम सुरुवातीला देण्यास विद्यापीठाने तयारी दाखवली. परंतु त्यासाठी काही अटीदेखील मांडल्या. यात ‘एमकेसीएल’सोबत झालेल्या सामंजस्य करारात सुधारणा करणे, सोपविण्यात आलेल्या सेवांमध्ये घट करणे, ई-सुविधेचे कमी पैसे देणे अशा प्रकारच्या अटींचा समावेश होता. साहजिकच ‘एमकेसीएल’च्या अधिकाऱ्यांना या अटी पटल्या नाहीत. विद्यापीठाला सेवा देऊनदेखील देयके देण्यासाठी जाचक असल्याची त्यांनी स्पष्टोक्ती केली. कुठल्याही निर्णयशिवाय बैठक संपली. संबंधित मुद्यावर आता मी काहीच बोलणार नाही. व्यवस्थापन परिषदेत हा मुद्दा ठेवण्यात येईल असे कुलगुरूंनी यानंतर स्पष्ट केले.परंतु सायंकाळी ६ नंतर परत एकदा ‘एमकेसीएल’च्या अधिकाऱ्यांना बोलविण्यात आले. यावेळी प्रशासनातील इतर अधिकारीदेखील उपस्थित होते. सुमारे अर्धा तास ही बैठक चालली. यानंतर ‘एमकेसीएल’चे पदाधिकारी ज्यावेळी बाहेर निघाले तेव्हा कुठलीही प्रतिक्रिया देण्यासाठी ते तयार नव्हते. एका अधिकाऱ्याची तर चक्क तब्येतच खराब झाली. विद्यापीठानेदेखील यासंदर्भात मौन साधले आहे. कोट्यवधींच्या देयकांच्या या मुद्द्यावर नेमकी एकाच दिवसात दुसऱ्यांदा चर्चा घेण्याची वेळ का आली असा प्रश्न उपस्थित होत आहे.(प्रतिनिधी)