शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

एफआयआर म्हणजे काय ?

By admin | Updated: January 3, 2015 02:29 IST

अट्टल गुन्हेगारांकडून गुन्ह्यांची कबुली वदवून घेण्याचे ठिकाण म्हणजे गुन्हे प्रकटीकरण शाखा कार्यालय. येथे रात्रंदिवस गुन्हेगारांचे आणणे - नेणे सुरू असते.

नागपूर : अट्टल गुन्हेगारांकडून गुन्ह्यांची कबुली वदवून घेण्याचे ठिकाण म्हणजे गुन्हे प्रकटीकरण शाखा कार्यालय. येथे रात्रंदिवस गुन्हेगारांचे आणणे - नेणे सुरू असते. आज मात्र गुन्हे प्रकटीकरण शाखेचा हॉल विद्यार्थ्यांनी खच्चून भरला होता. येथे एरवी कठोरपणे वागणारे पोलीस अधिकारी विद्यार्थ्यांसमोर हसत खेळत मार्गदर्शन करीत होते. एफआयआर म्हणजे काय, फिंगर प्रिंट कुणाचे आणि कशासाठी घेतले जातात, गुन्हेशाखेचे कामकाज कसे चालते, ते या विद्यार्थ्यांना समजावून सांगत होते.शुक्रवारी पोलीस दलातर्फे राज्यभर ‘रेझिंग डे’ म्हणून साजरा केला जातो. या अनुषंगाने पोलीस दलातर्फे ठिकठिकाणी विविध उपक्रमाचे आयोजन केले जातात. पोलीस आणि नागरिकांमधील रुंदावलेली दरी कमी व्हावी, नागरिक आणि विद्यार्थ्यांना पोलिसांची कार्यपध्दती माहीत व्हावी,असा त्यामागे उद्देश आहे. मातृसेवा संघ इन्स्टिट्यूट आॅफ सोशल वर्क येथे आज ‘रेझिंग विक‘चा प्रारंभ झाला.गुन्हेशाखेच्या उपायुक्त दीपाली मासिरकर यांनी ‘समाजातील गुन्हेगारी आणि विद्यार्थ्यांची भूमिका‘ यावर भाष्य केले. सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी विद्यार्थ्यांना महिला अत्याचार प्रतिबंध, स्त्री भ्रूणहत्या व त्याअनुषंगाने सुरक्षेचे उपाय यावर भाष्य केले. सायबर शाखेचे दिनेश दहातोंडे, यांनी विद्यार्थ्यांना सायबर गुन्हे रोखण्याकरिता काय करावे, त्याबाबत मार्गदर्शन केले. गुन्हेशाखेच्या कार्यालयातही आज दुपारी २ वाजता विद्यार्थ्यांचा ‘खास वर्ग’ भरविण्यात आला होता. सदरमधील डिसेंट इंग्लिश स्कूल अ‍ॅन्ड ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांना पीआय संभाजी मुरकुटे, पीआय किशोर सुपारे, पीआय इंगोले आदींनी विद्यार्थ्यांना गुन्हेशाखेचे कामकाज कसे चालते, त्याची सविस्तर माहिती दिली. एफआयआर म्हणजे काय, त्याचे महत्त्व काय, फिंगर प्रिंट कुणाचे घेतले जातात, गुन्हेगारांना शोधण्यासाठी त्याचा कसा उपयोग होतो, वाचक शाखा, अमली पदार्थ विरोधी शाखा, सायबर क्राईम, यांची जबाबदारी काय, त्याची माहिती समजावून सांगितली. एवढेच नव्हे तर, विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरेही दिली. (प्रतिनिधी)