Weather Update : विदर्भाला अवकाळी पावसाचा येल्लो अलर्ट ! पुढच्या ४८ तासात 'या' जिल्ह्यांना गारपीट आणि वादळी वाऱ्यांची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 20:28 IST2026-03-20T20:27:09+5:302026-03-20T20:28:32+5:30

Nagpur : विदर्भात सध्या हवामानात मोठे बदल होत असून, हवामान विभागाने पुढील काही दिवसांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. या कालावधीत विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

Weather Update : Yellow alert for unseasonal rains in Vidarbha! Hail and windstorm likely in these districts in the next 48 hours | Weather Update : विदर्भाला अवकाळी पावसाचा येल्लो अलर्ट ! पुढच्या ४८ तासात 'या' जिल्ह्यांना गारपीट आणि वादळी वाऱ्यांची शक्यता

Yellow alert for unseasonal rains in Vidarbha! Hail and windstorm likely in these districts in the next 48 hours

नागपूर :विदर्भात सध्या हवामानात मोठे बदल होत असून, हवामान विभागाने पुढील काही दिवसांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. या कालावधीत विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

४८ तासांत बदलणार हवामान

हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, विदर्भातील बहुतांश भागात सध्या ढगाळ वातावरण निर्माण झाले असून, पुढील 48 तासांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. काही भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाची गारपीटही होऊ शकते.

विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये आज दुपारी ४ नंतर पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेषतः नागपूर, गोंदिया आणि अमरावती जिल्ह्यांत काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट होऊ शकते.

तसेच बुलढाणा, अकोला, चंद्रपूर आणि भंडारा येथे ताशी सुमारे ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहण्याचा अंदाज असून, विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. वर्धा, गडचिरोली, यवतमाळ आणि वाशिम या जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

याशिवाय, मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात ताशी ५० ते ६० किमी वेगाने वारे वाहण्याचा अंदाज असून, तेथेही विजांसह पावसाची शक्यता आहे.

 

Web Title : विदर्भ मौसम अलर्ट: अगले 48 घंटों में ओलावृष्टि और तेज़ हवाओं का पूर्वानुमान

Web Summary : विदर्भ में अगले 48 घंटों के लिए येलो अलर्ट जारी किया गया है। नागपुर, गोंदिया और अमरावती में गरज, बिजली और ओलावृष्टि की संभावना है। अन्य जिलों में तेज हवाएं और बारिश होगी। मराठवाड़ा और उत्तरी महाराष्ट्र में भी इसी तरह के मौसम की आशंका है।

Web Title : Vidarbha Weather Alert: Hailstorm and Strong Winds Forecast in 48 Hours

Web Summary : Vidarbha faces a yellow alert for the next 48 hours. Expect thunderstorms, lightning, and possible hailstorms, especially in Nagpur, Gondia, and Amravati. Other districts will experience strong winds and rain. Marathwada and North Maharashtra also brace for similar weather conditions.