शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
3
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
4
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
5
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
6
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
7
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
8
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
9
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
10
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
11
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
12
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
13
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
14
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
15
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
16
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
17
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
18
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
19
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
20
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
Daily Top 2Weekly Top 5

७०२ गावांत पाणीटंचाई

By admin | Updated: February 5, 2015 01:08 IST

उन्हाळ्याच्या दिवसात जिल्ह्यातील ७०२ गावांत पाणीटंचाई भासण्याची शक्यता आहे. टंचाईग्रस्त गावांत तातडीने उपायोजना हाती घेण्याचे निर्देश जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निशा सावरकर

जि. प. अध्यक्षांचे निर्देश : ११५६ उपाययोजना राबवानागपूर : उन्हाळ्याच्या दिवसात जिल्ह्यातील ७०२ गावांत पाणीटंचाई भासण्याची शक्यता आहे. टंचाईग्रस्त गावांत तातडीने उपायोजना हाती घेण्याचे निर्देश जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निशा सावरकर यांनी बुधवारी जलव्यवस्थापन समितीच्या बैठकीत दिले. टंचाईग्रस्त ७०२ गावांत ११५६ उपययोजना राबविण्यासाठी पाणी पुरवठा विभागाने सात कोटींचा आराखडा तयार केला आहे. जिल्हा प्रशासनसाने तो मंजुरीसाठी सरकारकडे पाठविला आहे. यात २१८ नळ योजनांची दुरुस्ती, २४२ विंधन विहिरी, २८५ खासगी विहिरी अधिग्रहण, ४० टँकरव्दारे पाणीपुरवठा आदी कामांचा समावेश असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.राष्ट्रीय पेयजल कार्यक्र मांतर्गत हिंगणा तालुक्यातील वागधरा येथील योजनेवर १ कोटी ८ लाख, रामटेक तालुक्यातील पटगोवरी येथे ७० लाख तर काटोल तालुक्यातील कचारी सावंगा येथील योजनेवर ५७ लाखांचा खर्च करण्याला मंजुरी देण्यात आली. मौदा तालुक्यातील पावजदवना येथील परमात्मा सेवक मंडळाची पाणी टाकी, तसेच मारोडी येथील वाढीव पाणीपुरवठा योजनेला मंजुरी देण्यात आली. गरज भासल्यास टंचाई निवारणासाठी तातडीने उपाययोजना कराव्या, निधीसाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याची सूचना अधिकाऱ्यांना केली. जि.प.ने चार वर्षांपूर्वी १२ टिप्पर व ६ पोकलँन्ड खरेदी केले होते. परंतु ही यंत्रसामुग्री वापराविना पडून आहे. काही तालुक्यात राजकीय नेत्याकडून याचा वापर होत आहे. या यंत्रसामुग्रीचा वापर जिल्ह्यातील तलाव व बंधाऱ्यांतील गाळ काढण्यासाठी करण्यात यावा असे निर्देश देण्यात आले. यातून सिंचन क्षमतेत वाढ होणार असल्याची माहिती सावरकर यांनी दिली. बैठकीला उपाध्यक्ष शरद डोणेकर, उकेश चव्हाण, सभापती आशा गायकवाड, पुष्पा वाघाडे, दिपक गेडाम यांच्यासह पाणीपुरवठा व सिंचन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)