शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
3
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
4
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
5
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
6
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
7
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
8
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
9
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
10
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
11
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
12
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
13
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
14
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
15
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
16
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
17
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
18
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
19
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
20
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

हॅलोअर्चिया सूक्ष्मजीवामुळे लोणार सरोवरातील पाणी गुलाबी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 07:00 IST

बुलडाणा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध लोणार सरोवरामधील हिरव्या रंगाचे पाणी हॅलोअर्चिया सूक्ष्मजीवामुळे गुलाबी झाले असा अहवाल पुणे येथील आगरकर रिसर्च इन्स्टिट्यूटने दिला आहे. हा अहवाल ‘लोकमत’ने मिळवला आहे.

ठळक मुद्देआगरकर रिसर्चचा अहवालखाऱ्या व आम्लयुक्त पाण्यात झपाट्याने वाढ होते

राकेश घानोडेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बुलडाणा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध लोणार सरोवरामधील हिरव्या रंगाचे पाणी हॅलोअर्चिया सूक्ष्मजीवामुळे गुलाबी झाले असा अहवाल पुणे येथील आगरकर रिसर्च इन्स्टिट्यूटने दिला आहे. हा अहवाल ‘लोकमत’ने मिळवला आहे.हॅलोअर्चिया सूक्ष्मजीवाला खारे व आम्लयुक्त पाणी फार आवडते. अशा गुणधर्माचे पाणी मिळाल्यानंतर त्यांची झपाट्याने वाढ होते. यावर्षी उष्ण तापमानामुळे लोणार सरोवरातील पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन झाले. परिणामी, या पाण्यातील खारेपणा व आम्ल नेहमीच्या तुलनेने अधिक वाढले. त्यातून हॅलोअर्चिया सूक्ष्मजीवाला पोषक वातावरण निर्माण होऊन त्यांची संख्या झपाट्याने वाढली. हे सूक्ष्मजीव तीव्र सूर्यकिरणापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी बेटा कॅरोटीन हे गुलाबी रंगद्रव्य मोठ्या प्रमाणात निर्माण करतात. त्यामुळे लोणार सरोवरातील हिरव्या पाण्याचा रंग अचानक बदलून गुलाबी झाला असे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.हॅलोअर्चिया सूक्ष्मजीव लोणार सरोवरात कुठून आले, या प्रश्नाचे उत्तरही आगरकर रिसर्च इन्स्टिट्यूटने दिले आहे. फ्लेमिंगो पक्षी गेल्यावर्षी अनेकदा लोणार सरोवरात आले होते. हे सूक्ष्मजीव फ्लेमिंगो पक्ष्यांच्या पंखांमध्ये जिवंत राहू शकतात. या पक्ष्यांच्या माध्यमातून या सूक्ष्मजीवांचा लोणार सरोवरामध्ये प्रवेश झाला असावा असे गृहितक अहवालात मांडण्यात आले आहे.इराणमधील सरोवरही झाले होते गुलाबीया सूक्ष्मजीवांमुळे इराण येथील उमरिया सरोवरातील पाणीही गुलाबी झाले होते अशी माहिती राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली आहे. त्यावरून जगामध्ये विविध ठिकाणी असा चमत्कारिक प्रकार घडून गेल्याचे स्पष्ट होते. याशिवाय आगरकर रिसर्च इन्स्टिट्यूटने मुंबईतील खाºया पाण्याच्या ठिकाणी आणि राजस्थानमधील सांभर सरोवरामध्ये हे सूक्ष्मजीव आढळून आल्याचे अहवालात म्हटले आहे. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका प्रलंबित आहे. आगरकर रिसर्च इन्स्टिट्यूटने उच्च न्यायालयाच्या आदेशावरून सदर अहवाल दिला आहे.

 

टॅग्स :lonar sarovarलोणार सरोवर