शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा मार्गावर वाहतुकीची कोंडी

By admin | Updated: May 15, 2016 02:45 IST

‘मेट्रो रेल्वे’ प्रकल्पाचे कार्य सुरू असल्याने शनिवारी पहाटेपासून वर्धा रोडवरील चिंचभुवन पूल ते सोनेगाव पोलीस स्टेशनपर्यंत वाहतुकीची कोंडी निर्माण झाली.

विमान पकडण्यासाठी पायी चालले प्रवासी : वाहतूक नियंत्रणाचा अभावनागपूर : ‘मेट्रो रेल्वे’ प्रकल्पाचे कार्य सुरू असल्याने शनिवारी पहाटेपासून वर्धा रोडवरील चिंचभुवन पूल ते सोनेगाव पोलीस स्टेशनपर्यंत वाहतुकीची कोंडी निर्माण झाली. वाहन लवकर काढण्याच्या प्रयत्नात अनेक वाहने अडकून पडली. विशेष म्हणजे, या मार्गावरील वाहतूक अनियंत्रित झाल्याने मोठी समस्या निर्माण झाली. विमानतळावर जाणाऱ्या काही प्रवाशांना हातात सामान घेऊन पायी चालावे लागले. सकाळी साधारण ६ वाजता विमानतळाच्या सीमेलगत वर्धा रोडच्या एका भागात वाहतुकीसाठी एक रस्ता सुरू होता. चिंचभुवन पूल ते नागपूरकडे येणाऱ्या मार्गावर कठडे लावण्यात आले होते. याच दरम्यान या मार्गावर वाहतूक खोळंबली. एका खासगी ट्रॅव्हल्सच्या कंडक्टरने रस्त्याच्या दुसऱ्या भागातील कठडे हटविले, आणि बसला समोर नेण्याचा प्रयत्न केला. परंतु अरुंद मार्गावर दोन्ही भागातून वाहतूक आल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण झाली. मेट्रो रेल्वे प्रोजेक्टचे कार्य सुरू असल्याने रोड डिव्हायडरच्या दोन्ही भागात साधारण चार फुटाच्या अंतरावर सुरक्षेसाठी टीन लावण्यात आले आहे. यामुळे हा रस्ता आणखी अरुंद झाला आहे. यातच सकाळच्यावेळी विमान प्रवाशांची संख्या मोठी असते. बहुसंख्य प्रवासी कारनेच विमानतळावर पोहचतात. चिंचभुवन आणि बुटीबोरी येथून अनेक प्रवासी रेल्वेस्थानकासाठी ये-जा करतात. याच वेळेस चंद्रपूर, अमरावती, हैदराबादसह विविध शहरांसाठी बसची रहदारी वाढलेली असते. परंतु या मार्गावरील वाहतुकीवर नियंत्रण नसल्याने वारंवार कोंडी निर्माण होते. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांना सूचना दिल्यानंतर साधारण अर्ध्या तासानंतर वाहतूक पोलीस आलेत. परंतु वाहतूक सुरळीत करण्यास अर्ध्या तासाच्यावर वेळ लागला. (प्रतिनिधी)वाहतूक विभागाला दिले पत्रवर्धा मार्गावरील वाहतुकीच्या कोंडीला घेऊन नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पाेरेशन लिमिटेडचे अध्यक्ष बृजेश दीक्षित म्हणाले, या मार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांना पत्र दिले आहे.