शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॉमात कॅथलॅबची प्रतीक्षा संपणार

By admin | Updated: August 15, 2016 02:03 IST

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा (मेडिकल) ड्रीम प्रोजेक्ट असलेले ट्रॉमा केअर सेंटरमध्ये आता रुग्णसेवेला गती आली आहे.

मेडिकल : मेंदूवरील शस्त्रक्रियांनाही सुरुवात नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा (मेडिकल) ड्रीम प्रोजेक्ट असलेले ट्रॉमा केअर सेंटरमध्ये आता रुग्णसेवेला गती आली आहे. गेल्या आठवड्यापासून सुरू झालेल्या मेंदूच्या शस्त्रक्रियेनंतर पुढील दोन आठवड्यात अद्ययावत कॅथलॅब येणार आहे. याचा फायदा अपघातात गंभीर जखमी झालेल्या रुग्णांवर तत्काळ उपचारासाठी होणार आहे. अनेक अडचणींवर मात करीत तब्बल सहा वर्षानंतर जुलै महिन्यात ट्रॉमा केअर सेंटरमध्ये रुग्णसेवेला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात ३० खाटांचे रुग्णालय, अद्ययावत अतिदक्षता विभाग आणि दोन शल्यक्रियागृह सेवेत दाखल झाले. सोबतच अपघाती रुग्णांसाठी १० मॉनिटर, कुठेही फिरवू शकता येतील असे ३० मोटराईज्ड बेड, ७ व्हेंटिलेटर, दोन आयसीयू आणि या सर्वांवर मॉनिटर करणारे यंत्र तातडीने ट्रामात कार्यान्वित झाले. याशिवाय ३० खाटांच्या ट्रॉमात भूलतज्ज्ञ, हृदयशल्यचिकित्सक, गॅस्ट्रो एन्ट्रॉलॉजिस्ट, युरॉलॉजिस्ट, अस्थिरोग शल्यचिकित्सक, सामान्य शल्यचिकित्सासोबतच न्यूरोसर्जरी तज्ज्ञाची भर पडली आहे. ट्रॉमा सेंटर सुरू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी तीन जणांचा जीव वाचवण्यात सर्जरी विभागप्रमुख डॉ. राज गजभिये यांच्या पथकाला यश आले होते. अस्थिरोग विभागाचे प्रमुख डॉ. सजल मित्रा यांनीही अस्थिरोगातील गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांना सुरुवात केली आहे. गेल्या आठवड्यात न्यूरो सर्जरीलाही सुरुवात झाली आहे. दुसऱ्या टप्प्यात साडेचार कोटी रुपये खर्च अपेक्षित असलेली कॅथलॅब येत्या दोन आठवड्यांत कार्यान्वित होईल, असे चित्र आहे. कॅथलॅब सुरू झाल्यास व्हॅस्क्युलर सर्जरी करणे शक्य होणार आहे. या खेरीज जोखमीच्या शस्त्रक्रिया, हृदयशल्यक्रियादेखील शक्य होणार आहेत. या शिवाय रुग्णाच्या खाटाजवळ जाऊन सिटी स्कॅन काढण्याचे यंत्रही लवकरच उपलब्ध होणार आहे. (प्रतिनिधी) १० कोटींमधून साधणार ट्रॉमाचा विकास जिल्हा विकास व नियोजन समितीकडून अलीकडेच १० कोटी मंजूर झाल्याने ट्रॉमात मध्यवर्ती आॅक्सिजन प्रकल्प, इंडोस्कोपी, ब्रांकोस्कोपीसह, आणखी दोन शल्यक्रियागृहांची भर पडणार आहे. याखेरीज दीड कोटी रुपयांचे अद्ययावत डिजिटल रेडिआॅलॉजी उपकरणही कार्यान्वित केले जाणार आहे, असे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी सांगितले.