शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
3
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
4
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
5
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
6
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
7
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
8
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
9
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
10
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
11
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
12
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
13
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
14
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
15
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
16
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
17
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
18
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
19
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
20
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
Daily Top 2Weekly Top 5

ठहरिये होश मे आऊ...तो चले जाईएगा..!!

By admin | Updated: June 15, 2015 03:01 IST

सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर यांचा भावगर्भ रेशमी स्वर...गीतांच्या आठवणींचे सुरेल हिंदोळे...

स्वरसम्राज्ञी सुमन कल्याणपूर यांचा सत्कार : मैत्री परिवाराचे आयोजननागपूर : सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर यांचा भावगर्भ रेशमी स्वर...गीतांच्या आठवणींचे सुरेल हिंदोळे...कालातीत भावनांना थेट हृदयापर्यंत पोहोचविणारा आवाज आणि सामान्य रसिकांच्या संवेदनेला घातलेली सादच. शब्दांना स्वरांच्या कोंदणाने आणि भावपूर्ण गायकीने परिसस्पर्श करणाऱ्या सुमनतार्इंना प्रत्यक्ष अनुभवताना रसिक ‘नॉस्टॉल्जिक’ झाले. त्यांनाच ऐकत राहण्याची इच्छा असताना त्यांनी निरोप घेतला. ‘ठहरिए होश मे आऊ...तो चले जाईयेगा...’ नेमकी हीच स्थिती या कार्यक्रमात रसिकांची झाली. मैत्री परिवार संस्थेच्यावतीने ‘सुमनगंध’ या कार्यक्रमाचे आयोजन रविवारी डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात करण्यात आले. याप्रसंगी सुमन कल्याणपूर यांची अनौपचारिक मुलाखत, सत्कार आणि त्यांच्या गीतांचा कार्यक्रम नागपूरकरांसाठी अविस्मरणीय ठरला. निवेदक मंगला खाडिलकर यांनी ही मुलाखत मोठ्या खुबीने खुलविली आणि त्यांच्याकडून काही गीते ऐकण्याचा आनंदही रसिकांना दिला. अनेक अजरामर हिंदी, मराठी गीतांचे गायन केलेल्या सुमनतार्इंनी एकूण १३ भाषांत गीते गायिली आहेत. पानांआड असलेला हिरवा चाफा चटकन दिसत नसला तरी त्याचा सुगंध मात्र त्याच्या अस्तित्वाची खूण पटवून देतो. सुमनतार्इंच्या सुरेल लोकप्रिय गीतांच्या सुगंधात आज रसिक हरविले. कार्यक्रमाचे उद्घाटन पं. प्रभाकरराव धाकडे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ज्येष्ठ समाजसेवक डॉ. विलास डांगरे, सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, संजय भेंडे, प्रमोद पेंडके, मंगला खाडिलकर, विष्णू मनोहर आणि सुमनतार्इंची मुलगी चारुल प्रामुख्याने उपस्थित होते. सुमनतार्इंनी गायलेल्या भूपाळीपासून कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला. काही गीते सादर झाल्यावर रसिकही सुमनतार्इंना ऐकण्यासाठी उत्सुक होते. त्या सभागृहात आल्या तेव्हाच उत्स्फूर्तपणे चाहत्यांनी उभे राहून त्यांचा सन्मान केला. सुमनतार्इंनी बोलावे, गीत सादर करावे आणि सभागृहात टाळ्यांच्या कडकडाटाचा गच्च पाऊस पडत राहावा, असाच हा अनुभव होता. शाल, श्रीफळ, मानपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. मुलाखतीच्या पहिल्याच प्रश्नाला उत्तर देताना त्यांचा आवाज ऐकल्यावरच टाळ्यांचा कडकडाट झाला. मग काय? गीतांचा प्रवास, त्यांच्या आवडत्या गायिका, या प्रवासातील काही अडथळे आणि त्यांनी गायलेल्या गीतांचे गायन....बस्स...यांनी सारा माहोल जिंकून घेतला. अतिशय साधेपणाने त्यांनी घराच्या पाण्याच्या टाकीवर बसून कसा रियाज केला, ते सांगितले. ‘नाविका रे.., शब्द शब्द जपून ठेव, आजकल तेरे मेरे प्यार के...’ अशा गीतांच्या सादरीकरणाने ही मैफिल अप्रतिम भावसौंदर्याने रंगली. कार्यक्रमात सुरभी ढोमणे, मुकुल पांडे, धनश्री देशपांडे यांनी गीत सादर केले. सुरसंगमचे सचिन ढोमणे यांनी संगीत संयोजन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माधुरी यावलकर आणि आभार मृणाल पाठक यांनी मानले. उदबत्ती विझल्यावरही त्याचा सुगंध दरवळत राहतोच. कार्यक्रम संपला पण रसिकांच्या मनात या कार्यक्रमाने स्वत:चा एक स्वतंत्र अबाधित कप्पा कायमचा कोरुन घेतला. त्यात सुमन कल्याणपूर नेहमीच असतील. (प्रतिनिधी)नाना मिसाळांनी काढले चित्रमुलाखत सुरु असताना चित्रकार नाना मिसाळ यांनी सुमनतार्इंचे रेखाचित्र काढले. यात त्यांनी सुमनतार्इंचा भाव नेमकेपणाने पकडला. सुमनतार्इंनी त्याची प्रशंसा करीत नागपूरकर रसिकांचेही आभार मानले.