शहरं
Join us  
Trending Stories
1
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
2
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
3
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
4
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
5
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
6
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
7
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
8
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
9
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
10
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
11
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
12
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
13
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
14
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
15
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
16
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
17
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
18
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
19
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
20
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
Daily Top 2Weekly Top 5

विठोबा समूहाला सर्वोत्कृष्ट पुरस्कार

By admin | Updated: May 26, 2017 02:55 IST

आयुर्वेदिक दंतमंजन आणि टूथपेस्ट या क्षेत्रात आघाडीच्या विठोबा समूहाला लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय,

लघु व मध्यम उद्योग मंत्रालय : देशातील १०० कंपन्यांमध्ये समावेशलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आयुर्वेदिक दंतमंजन आणि टूथपेस्ट या क्षेत्रात आघाडीच्या विठोबा समूहाला लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय, भारत सरकार आणि भारत लघु व मध्यम उद्योग फोरमच्या संयुक्त विद्यमाने नवी दिल्लीत झालेल्या सोहळ्यात पुरस्काराने गौरविण्यात आले. केंद्रीय लघु व मध्यम उद्योग मंत्री कलराज मिश्र यांच्या हस्ते समूहाचे व्यवस्थापकीय संचालक सुदर्शन शेंडे यांना पुरस्कार, ट्रॉफी आणि प्रशस्तीपत्र देण्यात आले. यावर्षीच्या सर्वोत्तम कामगिरीसाठी निवडण्यात आलेल्या १०० कंपन्यांमध्ये विठोबा समूहाचा समावेश आहे, हे विशेष.आयुर्वेदिक उत्पादनांच्या क्षेत्रात कंपनीने दिलेल्या योगदानाची दखल घेत मिश्र यांनी समूहाची प्रशंसा केली. कार्यक्रमात अ‍ॅक्सिस बँक लिमिटेडच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालिका शिखा शर्मा, लघु आणि मध्यम उद्योग फोरमचे प्रल्हाद कक्कड आणि विनोद कुमार उपस्थित होते. या पुरस्कारासाठी देशभरातील ४२ कंपन्यांमधून १०० कंपन्यांची निवड करण्यात आली. एक परिपूर्ण आयुर्वेदिक उत्पादन देशातील गल्ली-चौकातील दुकानांमध्ये उपलब्ध व्हावे, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. आपला प्राचीन आयुर्वेदिक खजिना आकर्षक पॅकिंग आणि विविध आकारात उपलब्ध करून देणे, हा कंपनीसाठी समाधानाचा विषय आहे. सर्व ठिकाणी विठोबा उत्पादनांची मागणी वाढत असून, ग्राहकांचा विश्वास आणि संतुष्टी विठोबाच्या चमूसाठी प्रेरणास्थान आहे. गेल्या काही वर्षांपासून समाजात दंतरोगाचे प्रमाण वाढले असून, प्रत्येक तिसरी व्यक्ती दंतरोगाने पीडित आहे. सर्व दंतरोगांवर प्रभावी आणि आयुर्वेदिक चिकित्सा पद्धतीने तयार केलेले विठोबा दंतमंजन आणि पेस्ट एकमात्र उपाय आहे. आयुर्वेदाचा अभ्यास आणि संशोधनानंतरच मंजन व पेस्ट तयार करण्यात येते. (वा.प्र.)