शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
3
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
4
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
5
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
6
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
7
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
8
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
9
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
10
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
11
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
12
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
13
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
14
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
15
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
16
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
17
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
18
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
19
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
20
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
Daily Top 2Weekly Top 5

विशाखा मैंद यांचे अपघाती निधन

By admin | Updated: May 6, 2017 02:21 IST

माजी नगरसेविका विशाखा बाबा मैंद (वय ५०) यांचे मध्य प्रदेशातील सौंसरजवळ अपघाती निधन झाले.

सौंसरजवळ कारचा टायर फुटला : मुलासह सहा जखमी लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : माजी नगरसेविका विशाखा बाबा मैंद (वय ५०) यांचे मध्य प्रदेशातील सौंसरजवळ अपघाती निधन झाले. शुक्रवारी सकाळी ५.४० च्या सुमारास त्यांच्या इनोव्हा कारचा टायर फुटल्यामुळे हा भीषण अपघात घडला. त्यात विशाखा यांचा मुलगा आणि अन्य सहा जण जबर जखमी झाले. मैंद यांच्या निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार, धरमपेठ झेंडा चौक परिसरात राहणाऱ्या विशाखा मैंद यांच्या भावाचे अडीच महिन्यांपूर्वी निधन झाले होते. त्यामुळे त्यांच्या अस्थिविसर्जनासाठी विशाखा त्यांच्या नातेवाईकांसह तीन दिवसांपूर्वी अलाहाबाद, काशी येथे गेल्या होत्या. धार्मिक विधी आटोपून शुक्रवारी सकाळी त्या नागपूरकडे परत येत असताना सौंसरच्या पुलाजवळ वाहनचालकाला झोप अनावर झाली. त्यामुळे भरधाव इनोव्हा कार रस्त्याच्या कडेला असलेल्या टोकदार दगडावर चढल्याने कारचा टायर फुटला. परिणामी भीषण अपघात होऊन कारमधील विशाखा यांच्यासह त्यांचा मुलगा शर्विल (वय १३), आई सुनंदा शेंडे (वय ७०) तसेच प्रीती शेंडे (वय ४२), भाची अदिती ताह्मण (वय २७)संजय वरखेडे आणि महेश परमार असे सर्वच्या सर्व गंभीर जखमी झाले. हा अपघात घडला त्यावेळी सौंसर नगर परिषदेचे मुख्याधिकारी खान तसेच मेडिकल स्टोर्सचे संचालक मानेकर तेथून जात होते. अपघात पाहून त्यांनी लगेच मदतीसाठी धाव घेतली. सर्व जखमींना बाहेर काढण्यात आले. त्यांना जवळच्या इस्पितळात नेले असता विशाखा यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यानंतर मैंद यांना अपघाताची माहिती देऊन सर्व जखमींना गंभीर अवस्थेत नागपुरात उपचारासाठी आणण्यात आले. भल्या सकाळी या अपघाताचे वृत्त नागपुरात पोहचले. त्यानंतर मैंद यांच्या आप्तस्वकियांनी त्यांच्या निवासस्थानी एकच गर्दी केली. सायंकाळी अंबाझरी घाटावर विशाखा यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.