विदर्भाला मान्सूनचा काेटा पूर्ण हाेण्याची प्रतीक्षाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:11 IST2021-09-12T04:11:45+5:302021-09-12T04:11:45+5:30

निशांत वानखेडे नागपूर : सप्टेंबर महिन्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे माेठा दिलासा मिळाला आहे. मात्र मान्सूनचा यावर्षीचा ...

Vidarbha is waiting for the monsoon to end | विदर्भाला मान्सूनचा काेटा पूर्ण हाेण्याची प्रतीक्षाच

विदर्भाला मान्सूनचा काेटा पूर्ण हाेण्याची प्रतीक्षाच

निशांत वानखेडे

नागपूर : सप्टेंबर महिन्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे माेठा दिलासा मिळाला आहे. मात्र मान्सूनचा यावर्षीचा काेटा पूर्ण हाेण्याची प्रतीक्षा अद्याप कायम आहे. जुलै व ऑगस्ट महिन्यात अपेक्षेप्रमाणे पाऊस न झाल्याने विदर्भात २० ते २५ टक्क्यांवर गेलेली तूट सप्टेंबरमध्ये भरून निघाली पण अजूनही ५ टक्के तुटवडा शिल्लक आहे. चिंताजनक म्हणजे गडचिराेली व गाेंदियामध्ये ही तूट मायनस २० वर आहे. त्यामुळे परतीच्या पावसावर भिस्त अवलंबून आहे.

मागील चार वर्षांच्या तुलनेत यावर्षी विदर्भात सर्वात कमी पाऊस नाेंदविण्यात आला आहे. यावर्षी जून ते ११ सप्टेंबरपर्यंत नागपूर विभागात ९१४.४ मिमी पावसाची नाेंद करण्यात आली आहे. सामान्यपणे या काळात ९५५.६ मिमी आणि सरासरी १०७२.५ मिमी पाऊस हाेण्याची अपेक्षा असते. मात्र अनियमित पावसामुळे आतापर्यंत सरासरी गाठणे शक्य झाले नाही. गेल्या वर्षी या काळात ९२७.७ मिमी पावसाची नाेंद झाली हाेती. विदर्भात जून ते ११ सप्टेंबर या काळात ८१६.८ मिमी पाऊस नाेेंदविला गेला. मागील वर्षी ८६४.१ मिमी एवढा हाेता. यावर्षी ८५ ते ९० टक्के पाऊस झाला आहे. हवामान विभागाच्या मते, हा सामान्य पाऊस म्हणता येईल. विभागाच्या आकडेवारीनुसार अद्याप ५ टक्के तुटवडा आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पावसाने दगा दिल्यानेच ही तूट वाढली आहे. पाऊस कमी झाल्याने विदर्भातील बहुतेक धरणे भरलेली नाहीत.

काेणत्या जिल्ह्यात किती तूट

मान्सूनची कमतरता गाेंदिया जिल्ह्यात सर्वाधिक (-२१) आहे. त्याखाली गडचिराेली (-२०) आहे. ही माेठी तूट म्हणता येईल. गाेंदियात ९४.३ मिमी तर गडचिराेलीत ५०.६ मिमी कमी पाऊस झाला. याशिवाय अमरावती (-१३), भंडारा (-११), बुलडाणा (-१०) तर अकाेला (-३) व चंद्रपूरमध्ये तुटवडा (-२) टक्क्यांवर आहे. यावर्षी जुलै व ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक पाऊस नाेंदविण्यात आला.

Web Title: Vidarbha is waiting for the monsoon to end