शहरं
Join us  
Trending Stories
1
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
4
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
5
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
6
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
7
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
8
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
9
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
10
दुसऱ्या प्रेग्नंसीमुळे ॲटलीच्या 'राका'मध्ये दीपिका पादुकोणची सीन्स कट? मेकर्सने दिलं स्पष्टीकरण
11
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
12
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
13
ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भरता गरजेची; भारताने होर्मुझ संकटातून धडा घ्यावा, अनिल अग्रवाल यांचे सुचक विधान
14
Divyanka Sirohi : भावाने दरवाजा लावायला सांगितला, परत येऊन पाहिलं तर...; अभिनेत्री दिव्यांका सिरोहीच्या मृत्यूची Inside Story
15
IRCTC: रेल्वे पॅन्ट्रीत कीटक-उंदरांचा वाढता उपद्रव; प्रवाशांच्या तक्रारींनंतर प्रशासनाकडून दखल
16
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
17
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
18
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
19
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
20
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भ पॅटर्नची कर्नाटकात जादू !

By admin | Updated: September 16, 2014 02:19 IST

विकासाच्या बाबतीत मागासलेल्या प्रदेशात (विदर्भात)

विधानसभाध्यक्षांनी घेतली माहिती : विधिमंडळाची केली पाहणीनागपूर : विकासाच्या बाबतीत मागासलेल्या प्रदेशात (विदर्भात) विधिमंडळाचे अधिवेशन घेऊन तेथील प्रश्नांवर चर्चा घडवून आणणाऱ्या महाराष्ट्र सरकारच्या ‘विदर्भ पॅटर्न’चा अभ्यास करण्यासाठी सोमवारी कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष व उपाध्यक्षांनी नागपूरला भेट दिली. अधिवेशनाची जागा, मंत्री, आमदारांची निवासव्यवस्थेची माहिती घेतानाच त्यांनी विदर्भ राज्याचा इतिहास आणि अधिवेशन होण्यामागची कारणेही जाणून घेतली.संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती होण्यापूर्वी विदर्भात स्वतंत्र राज्यासाठी आंदोलने सुरू होती. मात्र मराठी भाषिकांचे एकच राज्य या मुद्यावर विदर्भाने संयुक्त महाराष्ट्रात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय घेताना संयुक्त महाराष्ट्रासाठी आग्रही असणाऱ्या तत्तकालीन नेतृत्वाने विदर्भाचा विकास करण्याचे अभिवचन दिले होते व ते पूर्ण करण्यासाठी या भागात विधिमंडळाचे अधिवेशन घेण्याचेही मान्य केले होते. ती परंपरा अद्यापही कायम आहे. विदर्भात येऊन या भागातील प्रश्नांवर चर्चा घडवून आणणे, हा यामागचा प्रमुख उद्देश होता. महाराष्ट्राप्रमाणेच कर्नाटकातही सीमावर्ती भागातील विकासाचे प्रश्न ऐरणीवर आले असून आंदोलने सुरू झाली आहेत. तेथील असंतोष दूर करण्यासाठी महाराष्ट्रात ज्याप्रमाणे ‘विदर्भ पॅटर्न’ राबविला जातो त्याच धर्तीवर कर्नाटकमध्ये राबविता येऊ शकतो काय, याचा अभ्यास करण्यासाठी कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष के. थिमप्पा आणि उपाध्यक्ष एन.एच. शिवशंकर रेड्डी यांनी सोमवारी नागपूरला भेट दिली. येथील विधानभवन, विधान परिषदेचे सभागृह, मंत्री आणि आमदारांच्या निवासाची व्यवस्था असलेले अनुक्रमे रविभवन आणि आमदार निवासाला भेट देऊन पाहणी केली. अधिकाऱ्यांशी चर्चा करून याची माहिती घेतली. अ‍ॅड. मधुकर किंमतकर यांनी त्यांना विदर्भाचा इतिहास, विदर्भ राज्यासाठी झालेले आंदोलन, संयुक्त महाराष्ट्रात समाविष्ट करताना तत्कालीन नेतृत्वांनी दिलेली आश्वासने, त्यानुसार नागपूरमध्ये होणारे विधिमंडळाचे अधिवेशन, मागासभागासाठी राज्यपालांच्या निर्देशानुसार होणारे निधीचे वाटप आणि त्यासंदर्भातील घटनात्मक तरतुदी याची सविस्तर माहिती या दोन्ही नेत्यांना दिली. (प्रतिनिधी)दीक्षाभूमीला भेटकर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष व उपाध्यक्षांनी दुपारी दीक्षाभूमीला भेट देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थी कलशाचे दर्शन घेतले आणि दीक्षाभूमी परिसराची पाहणी केली. या स्मारकाच्या आतील छायाचित्र प्रदर्शनाचे अवलोकनही त्यांनी केले, तसेच स्मारकाचीही माहिती त्यांनी घेतली.