नागपूर : सूर्याची तीव्रता दिवसेंदिवस अधिकच भीषण हाेत चालली असून उन्हाच्या चटक्यांमुळे नागपूरकरांच्या अंगाची लाहीलाही हाेत आहे. रविवारी पुन्हा तापमानात अंशत: वाढ हाेत पारा ४४.४ अंशावर पाेहचला. त्यामुळे बाहेर निघाले की सूर्याचे चटके व घामाच्या धारा वाहत हाेत्या. सुट्टी असूनही लाेक घराबाहेर पडण्याची हिंमत करू शकले नाही.
नागपुरमध्ये मागील आठ दिवसांपासून अक्षरशः आकाशातून आग बरसत असल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. तापमान ४४ अंशाच्या वर कायम आहे. रविवारी दिवसाचे तापमान सरासरीपेक्षा ३.८ अंशांनी वाढून ४४.४ अंश सेल्सियसवर पोहोचले. यामुळे हा हंगामातील आतापर्यंतचा सर्वाधिक उष्ण दिवस ठरला आहे. सोमवारीही भीषण उष्णतेचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मागील आठ दिवसांपासून नागपूरचे तापमान सतत ४१ अंश सेल्सियसच्या वर राहिले आहे. एवढेच नव्हे तर संपूर्ण विदर्भ प्रदेश आगीच्या भट्टीसारखा तापत आहे.
रविवार असूनही तीव्र उष्णतेमुळे नागपूरचे रस्ते, फ्लायओव्हरवर दुपारी १२ ते ४ दरम्यान अक्षरशः शुकशुकाट दिसून आला. चारनंतर आकाशात ठिकठिकाणी ढगांची उपस्थिती जाणवली, मात्र वातावरणातील उष्णता कमी झाली नाही. उकाड्याचा प्रभाव सायंकाळ उशिरापर्यंत कायम राहिला. सकाळी आर्द्रता ३६ टक्के होती, तर रात्री ती घटून ३० टक्क्यांवर आली.
साेमवारीही ताप, नंतर मिळेल गारवा
हवामान विभागाच्या अंदाजानुसार २० एप्रिल रोजी नागपूरसह विदर्भातील बहुतांश भागात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. अमरावती, अकोला, वाशीम, चंद्रपूर आणि यवतमाळ येथे जोरदार वाऱ्यासह पावसाचेही संकेत आहेत. तर वर्धा जिल्ह्यात उष्णतेचा तडाखा कायम राहणार आहे. २१ एप्रिलपासून हवामानात बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या काळात नागपूरसह इतर काही जिल्ह्यात ढगाळ वातावरण, वादळी वारे व हलक्या पावसाचीही शक्यता आहे. त्यामुळे उष्णतेपासून दिलासा मिळू शकेल.
असा चढला पारा (अंशात)तारीख तापमान११ एप्रिल ३९.४१२ एप्रिल ४१.४१३ एप्रिल ४१.४१४ एप्रिल ४२.२१५ एप्रिल ४३.४१६ एप्रिल ४३.२१७ एप्रिल ४४१८ एप्रिल ४४.२१९ एप्रिल ४४.४
Web Summary : Nagpur sizzles under intense heat, reaching 44.4°C. Vidarbha region is experiencing furnace-like conditions. Relief is expected from April 21st with potential rain and thunderstorms in some districts, including Nagpur, offering respite from the heatwave.
Web Summary : नागपुर भीषण गर्मी से झुलस रहा है, तापमान 44.4 डिग्री सेल्सियस तक पहुंचा। विदर्भ क्षेत्र भट्टी जैसा तप रहा है। 21 अप्रैल से नागपुर सहित कुछ जिलों में बारिश और गरज के साथ राहत मिलने की उम्मीद है।