विषारी वायूचा बळी!  सांडपाणी चेंबरमध्ये दोन कामगारांचा गुदमरून मृत्यू; बुटीबोरी एमआयडीसी येथील घटना 

By जितेंद्र ढवळे | Updated: May 17, 2026 05:20 IST2026-05-17T05:20:31+5:302026-05-17T05:20:46+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : एमआयडीसी (बुटीबोरी) येथील के-३ प्लॉटसमोरील सांडपाण्याच्या पाइपलाइनच्या चेंबरमध्ये सफाईचे काम करताना विषारी वायूमुळे गुदमरून ...

Victim of toxic gas! Two workers suffocate to death in sewage chamber; Incident at Butibori MIDC | विषारी वायूचा बळी!  सांडपाणी चेंबरमध्ये दोन कामगारांचा गुदमरून मृत्यू; बुटीबोरी एमआयडीसी येथील घटना 

विषारी वायूचा बळी!  सांडपाणी चेंबरमध्ये दोन कामगारांचा गुदमरून मृत्यू; बुटीबोरी एमआयडीसी येथील घटना 

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एमआयडीसी (बुटीबोरी) येथील के-३ प्लॉटसमोरील सांडपाण्याच्या पाइपलाइनच्या चेंबरमध्ये सफाईचे काम करताना विषारी वायूमुळे गुदमरून दोन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सायंकाळी ६ च्या सुमारास उघडकीस आली. मृतांमध्ये प्रशांत मनुजे व राहुल मडावी यांचा समावेश असून सुरेश पातेकर हे गंभीर अवस्थेत रुग्णालयात उपचार घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कंत्राटदार गौरव पुरी यांच्या सांगण्यावरून प्रशांत मनुजे, राहुल मडावी आणि सुरेश पातेकर हे सांडपाण्याच्या बंद पाइपलाइनच्या चेंबरमध्ये सफाईसाठी उतरले होते. मात्र कोणतेही सुरक्षा उपाय किंवा संरक्षण साहित्य उपलब्ध करून न देता त्यांना बंद चेंबरमध्ये उतरविण्यात आले. सफाईदरम्यान सांडपाण्यातील केमिकल्समधून निर्माण झालेल्या विषारी वायूमुळे तिघेही गुदमरले.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत चेंबर उघडले आणि तिघांनाही बाहेर काढले. सुरेश पातेकर यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रशांत मनुजे व राहुल मडावी यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता.

या प्रकरणी एमआयडीसी बुटीबोरी पोलीस ठाण्यात कंत्राटदार गौरव पुरी यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०५ तसेच मॅन्युअल स्कॅव्हेंजर्स कायद्याच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कामगारांना कोणतेही संरक्षण साहित्य न देता धोकादायक बंद चेंबरमध्ये काम करण्यास भाग पाडणे हा गुन्ह्याचा मुख्य आधार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. पोलिसांनी कंत्राटदार गौरव पुरी यांना ताब्यात घेतले असून अटकेची प्रक्रिया सुरू आहे.

Web Title : बुटीबोरी एमआईडीसी सीवर में जहरीली गैस से दो मजदूरों की मौत

Web Summary : बुटीबोरी एमआईडीसी में सीवर की सफाई करते समय जहरीली गैस के कारण दो मजदूरों की मौत हो गई और एक अस्पताल में भर्ती है। ठेकेदार को लापरवाही के लिए गिरफ्तार किया गया है।

Web Title : Two workers die from toxic gas in Butibori MIDC sewer.

Web Summary : Two workers died and another was hospitalized after inhaling toxic gas while cleaning a sewer in Butibori MIDC. The contractor is arrested for negligence.