नाशिक जिल्ह्यात शिरवाडे वणीजवळ गो तस्करांचे वाहन पकडले, ग्रामस्थांनी महामार्गाची केली कोंडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 14:58 IST2026-01-08T14:57:38+5:302026-01-08T14:58:10+5:30
गुरुवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास एक आयशर वाहनातून सुमारे 63 जनावरे घेऊन जात असल्याचे गोरक्षकांच्या निदर्शनास आल्यानंतर सदर आयशर अडवण्यात आला...

नाशिक जिल्ह्यात शिरवाडे वणीजवळ गो तस्करांचे वाहन पकडले, ग्रामस्थांनी महामार्गाची केली कोंडी
पिंपळगाव बसवंत : मुंबई-आग्रा महामार्गावर शिरवाडे वनी येथे गो तस्करांचा आयशर पकडल्यानंतर पोलीस त्याला संरक्षण देत असल्याच्या निषेधार्थ स्थानिक गोरक्षकांनी सदर आयशर महामार्गावर आडवा लावून दिला असल्यामुळे सुमारे सात ते आठ किलोमीटर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली आहे. जोपर्यंत गिरीश महाजन अथवा पोलीस अधीक्षक घटनास्थळी येत नाही तोपर्यंत तेथून न हटण्याचा निर्धार गोरक्षकांनी केला आहे.
गुरुवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास एक आयशर वाहनातून सुमारे 63 जनावरे घेऊन जात असल्याचे गोरक्षकांच्या निदर्शनास आल्यानंतर सदर आयशर अडवण्यात आला. या ठिकाणी पोलीसही आले परंतु सदर आयशर आणि पोलीस यांचे संगनमत असल्याचा आरोप करत गोरक्षकांनी सदर आयशर आडवा लावून दिला असून महामार्ग ठप्प केला आहे. त्यामुळे महामार्गावर सुमारे सात ते आठ किलोमीटर वाहनांची रांग लागली आहे.