शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या  कांशीनगरातील भाजीविक्रेत्यांनी केली पर्यायी जागेची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 22:28 IST

कांशीनगर स्वयंरोजगार समितीअंतर्गत शुक्रवारी संविधान चौकात भाजीविक्रेत्यांनी प्रतिकात्मक भाजी विकून त्यांच्यावरील कारवाईचा निषेध केला. तसेच येथील भाजीविक्रेत्यांना महापालिकेने पर्यायी स्थायी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली.

ठळक मुद्देसंविधान चौकात आंदोलन : भाजी विकून वेधले लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कांशीनगर येथे रस्त्यावर भरणाऱ्या आठवडी बाजाराला स्थानिक नागरिकांचा विरोध आहे. सोबतच रस्त्यावर दुकान लावत असल्याने महापालिकेकडूनही कारवाई केली जात आहे. मागील काही आठवड्यांपासून ही कारवाई तीव्र झाली आहे. त्यामुळे आठवडी बाजारात भाजीविक्री करणाऱ्यांचा रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. कांशीनगर स्वयंरोजगार समितीअंतर्गत शुक्रवारी संविधान चौकात भाजीविक्रेत्यांनी प्रतिकात्मक भाजी विकून त्यांच्यावरील कारवाईचा निषेध केला. तसेच येथील भाजीविक्रेत्यांना महापालिकेने पर्यायी स्थायी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली.समितीच्या अध्यक्ष अलका कांबळे यांच्या नेतृत्वात भाजीविक्रेत्यांनी आंदोलन केले. कांबळे यांनी यावेळी सांगितले, २००६ पासून कांशीनगर येथे आठवडी बाजार भरतो आहे. हा बाजार रस्त्यावरच भरत असल्याने ये-जा करणाऱ्या लोकांना त्रास होतो. तेव्हापासूनच आम्ही महापालिकेला पर्यायी जागेची मागणी करीत आहोत. परंतु कुणीही लक्ष दिले नाही. या ठिकाणी ३५० भाजीविक्रेते आहे. हेच त्याचे रोजगाराचे एकमेव साधन आहे. तेच हिरावण्याचा प्रयत्न केला जात आहे. यांनाही रस्त्यावर बसायचे नाही. परंतु त्यांना पर्यायी जागा तर उपलब्ध करायला हवी. याच परिसरात खसरा नंबर ५१-१, ५१-२ मौजा बाबुलखेडा ही बाजारपेठेसाठी राखीव जागा आहे. त्या ठिकाणी यांना स्थायी बसविण्यात यावे. यासाठी मनपाने पुढाकतार घएऊन भाजीविक्रेत्यांशी समन्वय साधून ही कारवाई करावी. भाजीविक्रेत्यांची उपासमार होणार नाही, याची काळजी घ्यावी, अशी मागणी केली.आंदोलनात सुरेंद्र मस्के, शोभा भगत, माला मस्के, अनसूया सुलतान, नितीन नकाते, गजानन चौहान यांच्यासह मोठ्या संख्येने भाजीविक्रेते सहभागी झाले होते.

टॅग्स :vegetableभाज्याagitationआंदोलन