शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
3
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
4
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
5
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
6
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
7
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
8
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
9
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
10
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
11
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
12
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
13
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
14
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
15
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
16
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
17
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
18
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
19
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
20
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
Daily Top 2Weekly Top 5

भाजीपाल्याचे ‘कॉर्पोरेट’ मार्केटिंग

By admin | Updated: June 15, 2015 03:11 IST

भाजीपाला विक्री म्हणजे एक किरकोळ उद्योग. समाजातही त्याला फारशी प्रतिष्ठा नाहीच.

जीवन रामावत नागपूरभाजीपाला विक्री म्हणजे एक किरकोळ उद्योग. समाजातही त्याला फारशी प्रतिष्ठा नाहीच. त्यामुळे कोणताही सुशिक्षित तरुण तो करण्याची हिंमत करीत नाही. मात्र एका तरुणाने या किरकोळ समजल्या जाणाऱ्या भाजीपाला विक्रीतून छोटा उद्योग उभा केला आहे, शिवाय शेतकऱ्यांना ‘कॉर्पोरेट’ मार्केटिंगची दिशा दाखविली आहे. ओम पाटील असे त्या तरुणाचे नाव आहे.बँकेतील नोकरी सोडून स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याची कल्पना त्याच्या डोक्यात आली. परंतु कोणताही व्यवसाय म्हटले की, त्यासाठी लाखो रुपयांचे भांडवल लागते. त्यावेळी ओमच्या खिशात मात्र केवळ दोन हजार रुपये होते, पण तरीही तो हिंमत हरला नाही. जिद्द व चिकाटीच्या बळावर त्याने भाजीपाला विक्रीचे दुकान सुरू केले आणि आज यशस्वी व्यवसायी झाला. तो संघर्ष करीत असताना त्याला पणन महामंडळाच्या ‘शेतकऱ्यांचा भाजीपाला ग्राहकांच्या दारी’ या योजनेची माहिती मिळाली. स्वत: शेतकऱ्याचा मुलगा असल्याने त्याला ती योजना पटली. त्यानुसार त्याने लगेच पणन महामंडळाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊ न योजना समजून घेतली आणि राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत त्याने खिशात कोणतेही भांडवल नसताना भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरू केला. भांडे प्लॉट परिसरातील निर्मलनगरी येथे भाजीपाला विक्रीचे पहिले दुकान थाटले. त्याला ग्राहकांचा फार मोठा प्रतिसाद मिळाला. त्यातून त्याला चांगला पैसा मिळू लागला, शिवाय त्याचा आत्मविश्वासही वाढला. यानंतर त्याने सात शेतकऱ्यांना एकत्रित करू न ओम असोसिएट स्वयंसहाय्यता शेतकरी गट स्थापन केला. पुढे पणन महामंडळाकडून एक गाडी भाड्याने घेऊ न, आता त्या गाडीतून भाजीपाला विक्री करीत आहे, तसेच कृषी विभागाच्या मदतीने जाफरनगर येथे गे्रडिंग व पॅकिंग सेंटर उभारले. या सेंटरवर शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला भाजीपाला स्वच्छ करू न त्याचे पॅकिंग केल्या जाते. यानंतर आॅर्डरप्रमाणे तो घरपोच पोहोचून दिल्या जातो. अशाप्रकारे तो सुमारे ६०० ग्राहकांना भाजीपाला पोहोचवितो. यातून ओमला दर महिन्याला ७० ते ८० हजार रुपये उत्पन्न मिळत असल्याचे तो म्हणाला. ७० तरुणांना रोजगार सध्या ६०० पेक्षा अधिक ग्राहकांना घरपोच भाजीपाला पोहोचविला जात असून, यातून ६० ते ७० तरुणांना रोजगार दिल्याचे समाधान यावेळी ओमने व्यक्त केले. शिवाय लवकरच शहरातील प्रमुख शासकीय कार्यालयांमध्येही भाजीपाला पोहोचविण्याची योजना असल्याचे तो म्हणाला. त्याच्या या भाजीपाल्याला दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात मागणी वाढत आहे. यातून त्याला चांगला नफा मिळत असून, शेतकऱ्यांनासुद्धा त्यांच्या भाजीपाल्याला योग्य भाव मिळत आहे. कृषी व पणन महामंडळाने शहरात सुमारे २० ते २५ गाड्यांचे वाटप केले असून, त्या माध्यमातून शेतकऱ्यांचा भाजीपाला ग्राहकांपर्यंत पोहोचविला जात आहे. नोकरी सोडून थाटले दुकान ओमने बी.कॉम.पर्यंतचे शिक्षण पूर्ण करू न बँकेत नोकरी मिळविली. परंतु काहीच दिवसांत त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला. त्यामुळे संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्याच्या खांद्यावर आली. मात्र १५ हजार रुपयांच्या पगारात घर चालविणे त्याला कठीण झाले. शेवटी त्याने नोकरी सोडण्याचा धाडसी निर्णय घेतला आणि भाजीपाल्याचा व्यवसाय सुरू केला. आज तो यात यशस्वी झाला असून, इतर तरुणांनाही रोजगार उपलब्ध करू न दिला आहे.