शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत  
2
नीट पेपरफुटीचा भंडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
3
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
4
Deepika Nagar :"रात्री साडेबाराला मोठा आवाज झाला अन्..." शेजाऱ्याने उघड केली 'त्या' रात्रीची संपूर्ण कहाणी!
5
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
6
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
7
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
8
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
9
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
10
"असे १०० जाळून टाकेन...", हॉस्पिटलबाहेर फोटो काढणाऱ्या पापाराझींवर भडकला सलमान खान, दिला थेट इशारा
11
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
12
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
13
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
14
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
15
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
16
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
17
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
18
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
19
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
20
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
Daily Top 2Weekly Top 5

‘एम्स’मध्ये आता गर्भाशय, स्तनाचा कर्करोगावर उपचार

By सुमेध वाघमार | Updated: June 3, 2024 19:20 IST

Nagpur : 'ब्रेकीथेरपी’ यंत्र झाले स्थापन

सुमेध वाघमारे 
नागपूर :  
गर्भाशयाचा मुखाचा कर्करोगासह अन्ननलिका, स्तन, डोके व मानेच्या कर्करोगावर रेडिएशन देण्यासाठी उपयुक्त अत्याधुनिक ‘ब्रेकीथेरपी’ यंत्र अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) स्थापन झाले. या यंत्राची अचूक उपचारात मदत होत असल्याने रुग्णांना मोठा फायदा होणार आहे. 
   

‘एम्स’ नागपूरचे कार्यकारी संचालक आणि सीईओ डॉ. पी.पी. जोशी यांनी सांगितले, कर्करोगाच्या बहुसंख्य  रुग्णांना रेडिओथेरपीची गरज पडते. ‘एम्स’मध्ये कर्करोगाच्या रुग्णांना एकाच छताखाली उपचाराची ही सोय उभी केली आहे. ‘ब्रेकीथेरपी’ यंत्रामुळे रेडिएशनचे उच्च डोस थेट कर्करोगाच्या पेशींपर्यंत पोहचतात. त्यामुळे त्याच्या सभोवतालच्या निरोगी पेशींचे नुकसान कमी होते. अधिक अचूक उपचारांमुळे कर्करोग बरा होण्याची शक्यता वाढते. ‘एम्स’मध्ये केवळ विदभार्तीलच नव्हे तर शेजारील राज्यातील कर्करोगाच्या रुग्णांवर उपचार केले जात आहेत. कर्करोगाच्या रुग्णांसाठी ब्रेकीथेरपी यंत्रासोबतच ‘लिनियर एक्सीलरेटर’ यंत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे. कर्करोगाच्या रूग्णांना आणि त्यांच्या कुटुंबियांना भावनिक आणि आर्थिक दृष्ट्या मदत करण्यासाठी विशेष कार्यक्रम देखील आहेत. 

उपचारासोबतच रुग्णांचीही काळजी
‘एम्स’मध्ये अत्याधुनिक उपचारासोबतच कर्करोगाच्या रुग्णांची काळजी घेण्यासाठी ‘श्रावण बाळ केंद’्र रुग्णांच्या सेवेत सुरू आहे. या शिवाय, ‘अंकुर’ या स्वयं मदत गटाकडून रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मानसिक पाठबळ दिले जाते. ‘तिलोत्तमा’ या उपक्रमातून कर्करोगा विषयी जनजागृती केली जाते.

टॅग्स :Cancer Awarenessकॅन्सर जनजागृतीcancerकर्करोगnagpurनागपूर