शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
2
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
3
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
4
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
5
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
6
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
7
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
8
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
9
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
10
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
11
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
12
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
13
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
14
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
15
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
16
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
17
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
18
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
19
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
20
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
Daily Top 2Weekly Top 5

अर्थसंकल्पात अवास्तव उत्पन्न दर्शविले

By admin | Updated: June 29, 2015 03:10 IST

महापालिकेच्या सन २०१५-१६ च्या प्रस्तावित अंदाजपत्रकात अवास्तव उत्पन्न दशंविण्यात आले आहे.

युनियनचा आरोप : अर्थसंकल्प नामंजूर करण्याची मागणीनागपूर : महापालिकेच्या सन २०१५-१६ च्या प्रस्तावित अंदाजपत्रकात अवास्तव उत्पन्न दशंविण्यात आले आहे. हा अर्थसंकल्प कामगारविरोधी व खासगीकरणाकडे नेणारा असल्याने सभागृहाने याला मंजूर करू नये, अशी मागणी नागपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशन एम्प्लॉईज युनियनने केली आहे. १ आॅगस्ट २०१५ पासून एलबीटी रद्द होणार आहे. परंतु प्रस्तावित अर्थसंकल्पात एलबीटीपासून ४५० कोटींचे उत्पन्न गृहित धरण्यात आले आहे. त्यामुळे अर्थसंकल्प १९४२ की १६४२ कोटींचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ३० जुलैपर्यंत एलबीटीपासून १४० कोटींचे उत्पन्न होण्याची शक्यता आहे. त्यातच एलबीटी न भरणाऱ्यांना सरकारने व्याज व दंड माफ केला आहे. जेएनएनयूआरएमअंतर्गत प्रस्तावित व सुरू असलेल्या प्रकल्पात मनपाला ३० टक्के निधी द्यावा लागणार आहे. या प्रकल्पांना विलंब झाल्यास खर्चात वाढ होणार आहे. हा बोजा मनपावर पडणार आहे. अशा १२ प्रकल्पांवर मनपाने ४२२.११ कोटी रु. खर्च केले आहे. अर्थसंकल्पात ही बाब दर्शविण्यात आलेली नाही. प्रकल्पाच्या वाढीव खर्चाला सभागृहाची मंजुरी घेण्यात आलेली नाही. अर्थसंकल्पात आस्थापना, प्रशासकीय व दुरुस्तीचा खर्च एकत्रित दर्शविण्यात आला आहे. आस्थापना खर्च हा स्वतंत्र दर्शविण्यात यावा. रोजंदारी कर्मचाऱ्यांना नोकरीत कायम करणे, कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी देण्यासाठी कोणत्याही स्वरूपाची तरतूद करण्यात आलेली नाही. वास्तवावर आधारित नसल्याने तो मंजूर करू नये, अशी मागणी युनियनचे अध्यक्ष जम्मू आनंद यांनी केली आहे.(प्रतिनिधी)