विद्यापीठाचे बजेट ३२९ कोटींचे

By Admin | Updated: January 31, 2016 02:57 IST2016-01-31T02:57:49+5:302016-01-31T02:57:49+5:30

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या २०१५-१६ च्या सुधारित तसेच २०१६-१७ साठी सादर होणाऱ्या ३२९ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला व्यवस्थापन परिषदेने मंजुरी दिली.

University's budget of 329 crores | विद्यापीठाचे बजेट ३२९ कोटींचे

विद्यापीठाचे बजेट ३२९ कोटींचे

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या २०१५-१६ च्या सुधारित तसेच २०१६-१७ साठी सादर होणाऱ्या ३२९ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला व्यवस्थापन परिषदेने मंजुरी दिली. शनिवारी व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पुढील महिन्यात होणाऱ्या विधीसभेच्या बैठकीत याला सादर करण्यात येईल.
२०१४-१५ च्या अर्थसंकल्पात ५२ कोटी रुपयांची वित्तीय तूट दाखविण्यात आली होती. पुढील आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात ही तूट २५ कोटींवर आली आहे. ही तूट कमी कशी झाली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अर्थसंकल्पात शैक्षणिक तसेच प्रशासकीय विभागांवर अधिक भर देण्यात आला आहे. शिवाय विद्यार्थ्यांसाठी नवीन योजना सुरू करण्यासंदर्भात पावले उचलण्यात आली आहे. राष्ट्रीय संशोधन मोहीम सुरू करण्यासाठी तरतुदीचा अर्थसंकल्पात समावेश आहे. विद्यापीठ स्तरावर चालविण्यात येणाऱ्या या मोहिमेसाठी नोडल अधिकारी म्हणून औषधीविज्ञानशास्त्र विभागाचे डॉ.निशिकांत राऊत यांच्या नावाला मंजुरी देण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.(प्रतिनिधी)

Web Title: University's budget of 329 crores