शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
3
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
4
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
5
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
6
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
7
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
8
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
9
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
11
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
12
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
13
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
14
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
15
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
16
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
17
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
18
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
19
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
20
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठात ‘मोर्चे’कारण!

By admin | Updated: August 13, 2015 03:31 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठावर सलग दुसऱ्या दिवशी पाच विद्यार्थी संघटनांनी धडक दिली.

संघटनांचा हल्लाबोल, अधिकारी हैराण : सलग दुसऱ्या दिवशी पाच संघटनांची धडकनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठावर सलग दुसऱ्या दिवशी पाच विद्यार्थी संघटनांनी धडक दिली. संघटनांच्या मागण्या वेगवेगळ्या असल्या तरी त्यांना सामोरे जाताना अधिकारी अक्षरश: हैराण झाले. सलग दुसऱ्या दिवशी विद्यापीठाच्या प्रशासकीय कामावर यामुळे परिणाम झाला.बुधवारच्या मोर्चांची सुरुवात सकाळीच झाली. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, आम आदमी पक्षाची छात्र युवा संघर्ष समिती, भारतीय जनता युवा मोर्चा व मोखारे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या गटाने एकापाठोपाठ एक विद्यापीठात धडक दिली. रखडलेले निकाल, बीकॉम-बीए या अभ्यासक्रमांचे कमी लागलेले निकाल, परीक्षा शुल्काची जास्त रक्कम, पुनर्मूल्यांकनाचे प्रलंबित निकाल इत्यादी मुद्यांवरुन या संघटनांनी विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा वर्षाव केला. या मोर्चांना सामोरे जाण्यातच वेळ गेल्याने कुलगुरूंना एकाही बैठकीचा जाता आले नाही. दरम्यान, विद्यार्थी आक्रमक होऊन कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.(प्रतिनिधी) अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची ओरडबीकॉमचा निकाल हा गेल्या ५ वर्षांपासून १८ ते २३ टक्के यादरम्यानच लागत आहे. यंदा सुमारे १८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. काही खासगी शिकवणीवर्ग चालकांनी व महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना तुमच्यावर अन्याय झाला आहे असे सांगून विद्यापीठाकडे पाठविले. मुळात विद्यार्थ्यांनी अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. परंतु चुकीच्या सल्ल्यांमुळे ते विद्यापीठात येऊन आपला वेळ वाया घालवत आहेत, अशी प्रतिक्रिया विद्यापीठातील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने नाव न घेण्याच्या अटीवर दिली.कुलगुरूंसमोर ठेवली भिक मागून जमविलेली रक्कमछात्र युवा संघर्ष समितीचे कार्यकर्ते सलग तिसऱ्या दिवशी विद्यापीठात पोहोचले. यावेळी सर्व प्रवेशद्वार बंद करण्यात आले होते. अखेर काही प्रतिनिधींना कुलगुरूंच्या कक्षात जाण्याची परवानगी देण्यात आली. परीक्षा शुल्काच्या विरोधात या कार्यकर्त्यांनी व्हेरायटी चौकात ‘भिक मांगो’ आंदोलन करुन पैसे जमा केले होते. हे पैसे या विद्यार्थ्यांनी कुलगुरूंना देण्याचा प्रयत्न केला. कुलगुरूंनी ते पैसे घेण्यास नकार दिला असता त्यांच्या टेबलवर पैशांची थैली ठेवण्यात आली अशी माहिती सूत्रांनी दिली. संघटनेचा हा प्रकार अशोभनीय असल्याची टीका विद्यापीठ वर्तुळातून होत होती.