शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठात ‘मॉडर्न’ वसतिगृह?

By admin | Updated: August 19, 2014 01:00 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वसतिगृहाच्या समस्यांमुळे विद्यार्थ्यांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. परंतु विद्यार्थ्यांची ही अडचण लवकरच दूर होण्याची चिन्हे आहेत.

प्रतीक्षा संपणार : आज मोठे निर्णय होण्याची शक्यतानागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वसतिगृहाच्या समस्यांमुळे विद्यार्थ्यांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. परंतु विद्यार्थ्यांची ही अडचण लवकरच दूर होण्याची चिन्हे आहेत. ‘लॉ कॉलेज’ चौकातील विद्यापीठ वसतिगृहाच्या जागेवर अत्याधुनिक सोयीसुविधांनी सुसज्ज असे ‘मॉडर्न’ वसतिगृह तयार करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मंगळवारी होणाऱ्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीमध्ये यासंदर्भात ठराव ठेवला जाणार आहे. व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. के.सी. देशमुख यांनी यासंदर्भात ठराव सादर केला आहे. विद्यापीठ वसतिगृृहाची अवस्था अतिशय जीर्ण झाली आहे.अस्वच्छ स्वच्छतागृहे, खानावळीची वाईट अवस्था अशा अवस्थेत विद्यार्थ्यांना नाईलाजाने राहावे लागत आहे. त्यामुळे या वसतिगृहाच्या ठिकाणी नवीन बहुमजली ‘मॉडर्न’ वसतिगृहाची निर्मिती करावी. याकरिता विद्यापीठ अनुदान आयोगासोबतच इतरही वित्तीय संस्थांची मदत घेण्यात यावी, अशा आशयाचा हा ठराव आहे. कार्यक्रम पत्रिकेनुसार या ठरावाला व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत विचारासाठी ठेवण्यात येणार आहे. (प्रतिनिधी) विभागप्रमुखांना ‘एसी’, विद्यार्थ्यांचे काय?व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत विद्यापीठाच्या सर्व शैक्षणिक विभागांच्या प्रमुखांच्या कक्षात वातानुकूलित यंत्र स्थापन करण्यासंदर्भात धोरणात्मक निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. २३ मे रोजी विभागप्रमुखांनी सादर केलेल्या निवेदनानुसार कुलगुरूंनी २७ वातानुकूलित यंत्र लावण्यासंबंधी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले होते. परंतु यासंदर्भात धोरणात्मक निर्णय न झाल्याने अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली नाही. २७ वातानुकूलित यंत्रांसाठी १३ लाख ३० हजारांचा खर्च अपेक्षित आहे. यावर व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. परंतु विद्यापीठातील काही विभागांत अगोदरपासूनच वातानुकूलित यंत्र लागलेले आहेत. अशास्थितीत कोणत्याही विभागप्रमुखांच्या कक्षात वातानुकूलित यंत्र प्रस्तावित करण्यात आले नव्हते असे संबंधित बाबीमध्ये नमूद कसे काय करण्यात आले आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दुसरीकडे अनेक शैक्षणिक विभागांमध्ये विद्यार्थ्यांना अस्वच्छतेत बसावे लागत आहे. काही ठिकाणी स्वच्छतागृहे अत्यंत वाईट परिस्थितीत आहेत. ‘वाय-फाय’ची विद्यार्थ्यांना अद्याप प्रतीक्षा आहे. अशास्थितीत विभागप्रमुखांच्या सोयींसोबतच विद्यार्थ्यांच्या समस्यांवर धोरणात्मक निर्णय घेण्याची आवश्यकता आहे.