शहरं
Join us  
Trending Stories
1
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगालमध्ये आणखी एका भाजपा उमेदवाराच्या कारवर हल्ला
3
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
4
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, फोडल्या काचा
5
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
6
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
7
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
8
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
9
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
10
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
11
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
12
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
13
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
14
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
15
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
16
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
17
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
18
बाबा वेंगाची सोन्याबाबत मोठी भविष्यवाणी; पाहा आता दरांबाबत काय म्हटलंय? खरं झालं तर...
19
"तुमच्यापाशी दुसरा तुल्यबल विचारच नाही..."; कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या सूनेने संजय गायकवाडांना सुनावले
20
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला; आमदार-प्रकाशक संघर्षातून राज्यात नवे राजकीय वादळ
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे एकमेकांवर वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:08 IST

नागपूर : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रलंबित ...

नागपूर : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रलंबित असलेल्या लोकसभा निवडणूक प्रकरणामध्ये शुक्रवारी स्वत:ची बाजू योग्य ठरविण्यासाठी विविध मुद्यांद्वारे एकमेकांवर वार केले. हा लढा तीन तास चालला.

२०१९ मधील लोकसभा निवडणुकीत नितीन गडकरी हे नागपूर मतदारसंघातून विजयी झाले आहेत. नाना पटोले हेदेखील याच मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात होते; पण ते पराभूत झाले. त्यानंतर त्यांनी गडकरी यांची निवड भ्रष्ट व्यवहाराच्या कारणावरून रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात निवडणूक याचिका दाखल केली. ती याचिका अद्याप प्रलंबित आहे. त्या याचिकेवर शुक्रवारी न्यायमूर्ती अतुल चांदूरकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, गडकरी यांच्या वतीने वरिष्ठ ॲड. सुनील मनोहर यांनी बाजू मांडताना विविध कायदेशीर मुद्यांकडे न्यायालयाचे लक्ष वेधून ही याचिका फेटाळून लावण्याची मागणी केली. लोकप्रतिनिधित्व कायद्यानुसार, निवडणूक याचिकेमध्ये भ्रष्ट व्यवहाराविषयी नमूद करण्यात आलेल्या माहितीचा स्रोत काय आहे, हे स्पष्ट करणे अनिवार्य आहे; परंतु पटोले यांची याचिका या तरतुदीची पूर्तता करीत नाही, तसेच त्यांचे निवडणूक याचिकेमधील प्रतिज्ञापत्रही बेकायदेशीर आहे. याशिवाय, दिवाणी प्रक्रिया संहितेतील सातव्या ऑर्डरमधील नियम ११ (ए) अंतर्गत दाखल अतिरिक्त अर्जावर उत्तर सादर करण्यासाठी पटोले यांनी स्वत: वारंवार वेळ घेतला. असे असताना त्यांनी दुसऱ्यावर विलंब करीत असल्याचा आरोप करणे निरर्थक आहे, असे ॲड. मनोहर यांनी सांगितले.

पटोले यांच्या वतीने ॲड. सतीश उके यांनी बाजू मांडली. त्यांनी गडकरी यांचे मुद्दे खोडून काढले. गडकरी यांनी नामनिर्देशनपत्रासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राची प्रत भारतीय निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर अपलोड करण्यात आली होती. तेथून ती प्रत मिळवून निवडणूक याचिकेला जोडण्यात आली आहे. त्यामुळे माहितीचा स्रोत स्पष्ट करण्यात आला नाही, हा मुद्दा निराधार आहे. गडकरी यांनी या प्रतिज्ञापत्रात उत्पन्नाची खरी माहिती दिली नाही. त्यांनी उत्पन्न लपवून ठेवले. उत्पन्नाचा स्रोत शेती असल्याचे नमूद केले, तसेच त्यांनी निवडणूक कायद्यातील विविध तरतुदी व नियमांचे पालन केले नाही. त्यामुळे त्यांची निवड रद्द करणे गरजेचे आहे, असे ॲड. उके यांनी सांगितले.

-------------------

पुढील सुनावणी १ ऑक्टोबरला

न्यायमूर्ती अतुल चांदूरकर यांनी गडकरी व पटोले यांचे म्हणणे ऐकून आवश्यक मुद्यांची नोंद घेतली. त्यानंतर उर्वरित मुद्दे ऐकण्यासाठी प्रकरणावर १ ऑक्टोबर रोजी पुढील सुनावणी निश्चित केली.