शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

यूसीएन कॅच आ ऊ ट !

By admin | Updated: March 26, 2015 02:32 IST

करोडो रुपयांचा करमणूक कर थकीत असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील करमणूक कर विभागाच्या चमूने यूसीएन केबल नेटवर्कच्या रामदासपेठ येथील कार्यालयाला सील ठोकले.

नागपूर : करोडो रुपयांचा करमणूक कर थकीत असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील करमणूक कर विभागाच्या चमूने यूसीएन केबल नेटवर्कच्या रामदासपेठ येथील कार्यालयाला सील ठोकले. ही कारवाई बुधवारी दुपारी २.३० वाजता झाली. परंतु गुरुवारी भारत-आॅस्ट्रेलियादरम्यान होणाऱ्या क्रिकेट मॅचमुळे तब्बल पाच तास प्रसारण थांबविल्यानंतर प्रशासनाने १६.५० लाख रुपये घेऊन कारवाई तात्पुरती मागे घेतली. मिळालेल्या माहितीनुसार, यूसीएन केबल नेटवर्कवर १ एप्रिल २०१३ पासून आतापर्यंत ५५ कोटी रुपयांपेक्षा अधिक करमणूक कर थकीत आहे. थकीत कर भरण्यासाठी प्रशासनातर्फे अनेकदा सांगण्यात आले. वारंवार सूचना देण्यात आली, परंतु त्याला गांभीर्याने घेण्यात आले नाही. शेवटी बुधवारी करमणूक कर विभागाच्या एका पथकाने यूसीएनच्या कार्यालयाला सील ठोकले. यानंतर नागपूर शहरासह विदर्भातील बहुतांश भागातील यूसीएनचे प्रसारण ठप्प पडले. पाच तास प्रसारण बंद राहिले. त्यामुळे ग्राहकांमध्ये असंतोष पसरू लागला. प्रशासनाने गुरुवारी होणारा क्रिकेट सामना लक्षात घेऊन अखेर ७.३० वाजता दरम्यान यूसीएनसोबत एक करार करीत थकीत रक्कम भरण्यास सांगितले. १६.५० लाख रुपयांची रक्कम यूसीएनकडून भरण्यात आली आणि ३१ मार्चपूर्वी उर्वरित रक्कम भरण्याच्या आश्वासनानंतर कारवाई मागे घेण्यात आली. त्यानंतर प्रसारण पुन्हा सुरू झाले. प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह बुधवारी करण्यात आलेल्या या कारवाईमुळे केबल आॅपरेटरमध्ये खळबळ उडाली तर दुसरीकडे केबल ग्राहकांमध्ये असंतोष पसरला आहे. सध्या क्रिकेटचा वर्ल्डकप सुरू आहे. गुरुवारी भारत आणि आॅस्ट्रेलिया यांच्या दरम्यान सेमी फायनलचा सामना खेळला जाणार आहे. अशा परिस्थितीत ही कारवाई केली असल्याने ग्राहक संतापले आहेत. मागील दोन वर्षांपासून करोडो रुपयांचा कर थकीत होता तेव्हा प्रशासन झोपले होते का? प्रशासनाची ही कारवाई ग्राहकांवर अन्याय करणारी आहे. कारण ग्राहकांकडून दर महिन्याला केबलचे शुल्क वसूल केले जात आहे. तेव्हा अचानकपणे प्रसारण थांबविण्याचे कारण काय, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. न्यायालयात जाण्याचा इशारा थकीत कराची वसुली करतांना सामान्यजनांना प्रशासनातर्फे वेठीस धरले जाते. परंतु करोडो रुपयांचे कर थकीत ठेवणाऱ्यांवर मात्र कारवाई होत नसल्याची बाब या घटनेतून समोर आली आहे. त्यामुळे सामान्यजनांवर बळजबरी करून मोठ्या असामींना रान मोकळे करण्याच्या या प्रकाराविरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा शहरातील अनेक सामाजिक संघटनांनी दिला आहे. कारवाई नव्हे अफवा ३१ मार्चपूर्वी करण्यात येणाऱ्या तांत्रिक अपग्रेडेशनच्या प्रक्रियेसाठी यूसीएनचे प्रसारण बुधवारी बंद ठेवण्यात आले होते. परंतु काही लोक यासंबंधात कारवाई झाल्याची अफवा पसरवीत आहेत, परंतु यात काहीही तथ्य नाही. अपग्रेडेशनची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रसारण पुन्हा सुरू करण्यात आले. गुरुवारी होणारा भारत-आॅस्ट्रेलियाचा क्रिकेट सामना ग्राहक कुठल्याही अडचणींशिवाय पाहू शकतील. - आशुतोष काणे, संचालक : यूसीएन केबल नेटवर्क पुन्हा होणार कारवाई यूसीएन केबल नेटवर्कवर मागील दोन वर्षांपासून करमणूक कर थकीत आहे. तो चुकविला नसल्याने बुधवारी सील करण्याची कारवाई करण्यात आली. केबल संचालक ग्राहकांकडून नियमितपणे कराचे शुल्क वसूल करीत आहेत. परंतु शासनाला मात्र कर देण्यात आलेला नाही. गुरुवारी होणाऱ्या क्रिकेट मॅचपूर्वी प्रसारण बंद झाल्याने ग्राहकांमध्ये असंतोष पसरला होता. ग्राहकांची भावना लक्षात घेऊन प्रसारण पुन्हा सुरू करण्यात येत आहे. परंतु ३१ मार्चपूर्वी थकीत रक्कम अदा न केल्यास पुन्हा कडक कारवाई केली जाईल. - अभिषेक कृष्णा, जिल्हाधिकारी