शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकीची रस्ता संरक्षक भिंतीच्या खांबाला धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:09 IST

पारशिवनी: भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकी स्वाराने रस्त्याच्या कडेला असलेल्या संरक्षक भिंतीच्या खांबाला धडक दिली. यात दोघांचा मृत्यू झाला तर ...

पारशिवनी: भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकी स्वाराने रस्त्याच्या कडेला असलेल्या संरक्षक भिंतीच्या खांबाला धडक दिली. यात दोघांचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला. ही घटना पारशिवनी सावनेर रस्त्यावरील दहेगाव मोडवर शनिवारी रात्री ९ वाजता च्या सुमारास घडली. जितेंद्र उमराव कोरडे (२३) रा.तिगाव. ता. पांढुर्णा व दिनेश भीमराव सोनवाणे (२८) रा.वाळेगाव, ता. पांढुर्णा अशी मृतांची तर प्रीतम अमरचंद धुर्वे (३०) रा. मेहलारी ता. मोहरखेड असे जखमीचे नाव आहे. हे तिघेही मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील राहणारे आहे. प्रीतम हा दिनेश सोबत कामगार कंत्राटदार जितेंद्र यांच्याकडे खैरी पंजाबराव जिनिंग मिल,खापा येथे काम करायचे. ते काही कामानिमित्त मनसर येथील जिनिंग मिलमध्ये आलेले होते. शनिवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास ते तिघेही दुचाकीने तिबलसीट मनसर वरून खापाकडे निघाले होते. त्यावेळी गाडी जितेंद्र कोरडे चालवित होता. गाडी वेगाने जात असता दहेगाव मोड वरील लोखंडी संरक्षक भिंतीच्या खांबाला दुचाकीने जोरात धडक दिली. त्यामुळे तिघेही रस्त्याच्या कडेला पडले. लागलीच घटनेची माहिती प्रीतमने खैरी पंजाबराव जिनिंग मिल येथील इतर सहकाऱ्यांना दिली . घटनास्थळी पारशिवनी पोलीस देखील पोहचले. पोलिसांनी तिघांना मेयो येथे उपचारासाठी दाखल केले. तपासनीअंती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दुचाकी चालक जितेंद्र याला मृत घोषित केले. दिनेश याचा रविवारी पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला.