शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

उपराजधानीत दोन नवे डायलिसिस केंद्र!

By admin | Updated: August 7, 2015 02:50 IST

मूत्रपिंडाच्या (किडनी) आजारात जीवनदायी असणाऱ्या केवळ चार डायलिसिस मशीन्सवर विदर्भासह शेजारच्या राज्यातील रुग्णांचा भार आहे.

मेयो व मेडिकलमध्ये होण्याची शक्यता : मुख्यमंत्र्यांच्या सचिवांची पाहणीलोकमत शुभवर्तमाननागपूर : मूत्रपिंडाच्या (किडनी) आजारात जीवनदायी असणाऱ्या केवळ चार डायलिसिस मशीन्सवर विदर्भासह शेजारच्या राज्यातील रुग्णांचा भार आहे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील नऊपैकी पाच मशीन्स बंद पडल्या आहेत. परिणामी या गंभीर व खर्चिक आजाराशी झगडत असणाऱ्या रुग्णांना एक तर जीवघेण्या प्रतीक्षेला सामोरे जावे लागत आहे. यावर उपाय म्हणून शहरात दोन नवे डायलिसिस सेंटर उघडण्याच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांचे सचिव प्रवीण दराडे यांनी बुधवारी मेडिकलचे तर गुरुवारी मेयो व रुग्णालयातील जागेची पाहणी केली. दोन्ही मूत्रपिंड कायमस्वरूपी किंवा तात्पुरत्या स्वरूपात निकामी झालेल्या रु ग्णाला डायलिसिस करण्याशिवाय पर्याय नसतो. विदर्भात केवळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाशी (मेडिकल) संलग्न असलेल्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात ही सोय उपलब्ध आहे. परंतु सुपरमधील डायलिसिस विभागातील नऊपैकी पाच मशीन बंद पडल्या आहेत. केवळ चार मशीनवर विभाग सुरू आहे. या मशीनवर रुग्णांचा भार वाढल्याने रु ग्णांवर दीर्घ प्रतीक्षा करण्याची वेळ आली आहे. याची गंभीर दखल मुख्यमंत्र्यांनी घेतल्याचे समजते. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी दराडे यांनी मेडिकलशी संलग्न असलेल्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयाची पाहणी केली. त्यांना या डायलिसिस सेंटरला ट्रेनिंग सेंटरच्या रूपातही उपयोगात आणायचे आहे. यासाठी तीन ते चार हजार स्क्वेअर फूट जागा हवी आहे. ही जागा सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपलब्ध नसल्याचे दिसून आले. गुरुवारी सकाळी १० वाजता दराडे यांनी इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) जागेची पाहणी केली. यावेळी मेयोचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. मधुकर प्रचंड यांनी रुग्णालय परिसरातील विविध तीन-चार जागांची माहिती दिली. सध्या जागा ठरली नसली तरी शहरात डायलिसिस सेंटर होण्याची शक्यता आहे. दराडे यांच्यासोबतच मुख्यमंत्री कार्यालयाच्या विशेष कार्य अधिकारी आशा पठाण व नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती श्याम वर्धने, अधीक्षक मोहन खामगावकर, डॉ. प्रशांत जोशी व मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे उपस्थित होते. (प्रतिनिधी)