दोन शेजाऱ्यांचा एकमेकांवर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:13 IST2021-08-14T04:13:20+5:302021-08-14T04:13:20+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - किरकोळ कारणावरून दोन शेजाऱ्यांनी घातक शस्त्रांनी एकमेकांवर हल्ला चढवला. यात दोघेही जबर जखमी झाले. ...

Two neighbors attack each other | दोन शेजाऱ्यांचा एकमेकांवर हल्ला

दोन शेजाऱ्यांचा एकमेकांवर हल्ला

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - किरकोळ कारणावरून दोन शेजाऱ्यांनी घातक शस्त्रांनी एकमेकांवर हल्ला चढवला. यात दोघेही जबर जखमी झाले. शुक्रवारी सायंकाळी पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता.

अजहर अली आणि दानिश साकिर हे महेंद्रनगरात आजूबाजूला राहतात. त्यांच्यात नेहमीच कुरबुरी होतात. शुक्रवारी सायंकाळी ६ पासून अशाच प्रकारे त्यांच्यात वाद सुरू झाला. पाहता पाहता ते हातघाईवर आले. दोघांच्या कुटुंबीयांनीही त्यात आगीत तेल ओतावे तसे केले. एकमेकांवर घातक शस्त्रांनी त्यांनी हल्ला चढवला. यामुळे अजहर आणि दानिश दोघेही गंभीर जखमी झाले. आरडाओरड ऐकून शेजारी धावले. त्यांनी या दोघांनाही आवरले. त्यानंतर मेयोत दाखल केले. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला. माहिती कळताच पाचपावलीचा पोलीस ताफा घटनास्थळी धावला. तोपर्यंत कुटुंबीयांची कुरबूर सुरूच होती. पोलिसांनी दोन्हीकडील मंडळींना ठाण्यात आणले. वृत्त लिहिस्तोवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

----

Web Title: Two neighbors attack each other