शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

भीषण अपघातात दोन ठार

By admin | Updated: July 6, 2014 00:50 IST

रुग्णाला नागपूर येथील मेडिकल हॉस्पिटलमध्ये पोहोचवून भिवापूरला परत जाणारी भरधाव अ‍ॅम्बुलन्स रोडवर उभ्या असलेल्या ट्रेलरवर मागून आदळली. यात दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला

अ‍ॅम्बुलन्स धडकली उभ्या ट्रेलरवर : एक जखमी, उमरेड येथील घटनाउमरेड/भिवापूर : रुग्णाला नागपूर येथील मेडिकल हॉस्पिटलमध्ये पोहोचवून भिवापूरला परत जाणारी भरधाव अ‍ॅम्बुलन्स रोडवर उभ्या असलेल्या ट्रेलरवर मागून आदळली. यात दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर, अन्य एक गंभीर जखमी झाला. ही घटना उमरेड - नागपूर मार्गावरील झोडे पेट्रोलपंपसमोर शनिवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास घडली. अपघातास कारणीभूत ही अ‍ॅम्बुलन्स उमरेडचे आ. सुधीर पारवे यांच्या लक्ष्मण बहुद्देशीय संस्थेची आहे. चेतन नीळकंठ निनावे (२५) व प्रवीण कुंभारे (२५) दोघेही रा. भिवापूर अशी मृतांची नावे असून, योगेश नीळकंठ निनावे (३०, रा. भिवापूर) असे गंभीर जखमी तरुणाचे नाव आहे. योगेश हा अ‍ॅम्बुलन्सचालक आहे. भिवापूर येथील आझाद चौकातील कन्नाके यांच्याकडील रुग्णाला शुक्रवारी स्थानिक ग्रामीण रुग्णालयात भरती केले होते. मात्र, डॉक्टरांच्या संपामुळे येथे उपचार न मिळाल्याने त्या रुग्णाला एमएच-४०/वाय-२२२८ क्रमांकाच्या अ‍ॅम्बुलन्सने नागपूर येथील मेडिकल हॉस्पिटलममध्ये रात्री ८.३० वाजताच्या सुमारास हलविले. तेथूून ही अ‍ॅम्बुलन्स भिवापूर येथे परत जात असताना उमरेड शहरालगतच्या झोडे पेट्रोल पंपासमोर रोडवर उभ्या असलेल्या एचआर-३८/एच-४२४४ क्रमांकाच्या ट्रेलवर मागून आदळली. यात चेतनचा घटनास्थळीच मृत्यू झाला. दरम्यान, प्रवीण व योगेशला लगेच नागपूर येथील मेडिकल हॉस्पिटलमध्ये हलविले. येथे कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरने प्रवीणवर वेळीच उपचार करायला सुरुवात केली नाही. त्यामुळे प्रवीणचा मृत्यू झाला तर योगेशवर मेडिकलमध्ये उपचार सुरू आहेत. योगेश हा अ‍ॅम्बुलन्सचालक असून, परतीच्या प्रवासात आपल्याला एकटेच परत यावे लागणार म्हणून त्याने त्याचा भाऊ चेतन व मित्र प्रवीणला सोबत घेतले होते. या धडकेत अ‍ॅम्बुलन्सची कॅबिन वेगळी झाली. यावरून धडकेची तीव्रता लक्षात येते. ट्रेलर रस्त्यावर उभा असताना इंडिकेटर सुरू नसल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघात होताच ट्रेलरचालक घटनास्थळावरून पसार झाला. या प्रकरणी उमरेड पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. ठाणेदार संजय पवार यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक नैताम तपास करीत आहे. (तालुका प्रतिनिधी)