शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

मेडिकलमध्ये दोन डॉक्टरांत जुंपली

By admin | Updated: February 8, 2015 01:14 IST

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) बाह्यरुग्ण विभागात शनिवारी दोन डॉक्टरांमध्ये चांगलीच जुंपली. या प्रकरणामुळे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

रुग्णाला भरती करण्याऐवजी दिली सुटी : डॉक्टरांमध्ये ‘सिनीअर’ व ‘ज्युनिअर’चा वाद नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) बाह्यरुग्ण विभागात शनिवारी दोन डॉक्टरांमध्ये चांगलीच जुंपली. या प्रकरणामुळे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. कामाला घेऊन निवासी डॉक्टरांमध्ये ‘सिनीअर’ व ‘ज्युनिअर’ हा वाद नेहमीच उफाळून येत असल्याचे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, आज बाह्यरुग्ण विभागात वरिष्ठ निवासी डॉक्टराने रुग्णाची तपासणी करून त्याला भरती करून घेण्याचा निरोप अटेडंटकडून कनिष्ठ डॉक्टराला दिला. परंतु अटेंडटने वरिष्ठ डॉक्टरांची नेमकी सूचना कनिष्ठ डॉक्टरला दिली नाही. परिणामी कनिष्ठ डॉक्टरने त्या रुग्णाला सुटी देऊन टाकली. कनिष्ठ डॉक्टर बाह्यरुग्ण विभागात आले असता वरिष्ठ डॉक्टरने रुग्णाबाबत विचारले असता सुटी दिल्याचे सांगताच, त्याला फैलावर घेतले. परिणामी, दोन्ही डॉक्टरांमध्ये बाह्यरुग्ण विभागात चांगलीच जुंपली. एकमेकांना हातवारे करून दोन्ही डॉक्टरांमध्ये प्रचंड वाद झाला. डॉक्टरच भांडत असल्याचे पाहून उपस्थितांची गर्दी वाढली. वाद विकोपाला जात असताना सहकारी डॉक्टर्सनी धाव घेऊन दोघांचेही भांडण सोडविले. इकडे रुग्णांकडे मात्र दुर्लक्ष झाले. ‘सिनीअर्स’से बात करना नही आता क्या’, असे वरिष्ठ डॉक्टरने ज्यु. डॉक्टरला धमकावल्याचेही सूत्रांनी सांगितले. दोन्ही डॉक्टरांमधील हा वाद उपस्थितांमध्ये मात्र चर्चेचा विषय ठरला. (प्रतिनिधी)