शहरं
Join us  
Trending Stories
1
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
2
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
3
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
4
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
5
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
6
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
7
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
8
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
9
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
10
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
11
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
12
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
13
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
14
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
15
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
16
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
17
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
19
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
20
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
Daily Top 2Weekly Top 5

आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले दोन भाऊ  : रेल्वेस्थानकावरून परतले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 23:42 IST

उत्तर प्रदेशातील नगला ब्रजलाल येथील दोन चुलतभाऊ महाल परिसरातील एका फरसानच्या दुकानात काम करतात. गुरुवारी त्यांना आजीचा मृत्यू झाल्याची बातमी समजली. दोघेही बॅग घेऊन रेल्वेस्थानकावर आले. परंतु एकही रिकामी जाणारी गाडी व मालगाडी नसल्यामुळे ते आपल्या आजीचे अंत्यदर्शनही घेऊ शकले नाहीत.

ठळक मुद्देमालगाडीही नसल्यामुळे झाली पंचाईत

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : उत्तर प्रदेशातील नगला ब्रजलाल येथील दोन चुलतभाऊ महाल परिसरातील एका फरसानच्या दुकानात काम करतात. गुरुवारी त्यांना आजीचा मृत्यू झाल्याची बातमी समजली. दोघेही बॅग घेऊन रेल्वेस्थानकावर आले. परंतु एकही रिकामी जाणारी गाडी व मालगाडी नसल्यामुळे ते आपल्या आजीचे अंत्यदर्शनही घेऊ शकले नाहीत. जड अंत:करणाने ते रेल्वेस्थानकावरून परतले.नगला ब्रजलाल, उत्तर प्रदेश येथील रहिवासी रोहित बघेल (२१) आणि प्रदीप बघेल (२०) हे दोघेही चुलत भाऊ आहेत. गावात कामधंदा नसल्याने सहा महिन्यांपूर्वी ते नागपुरात आले. महाल येथील एका फरसानच्या दुकानात दोघांना काम मिळाले. काम मिळाल्याने ते आनंदी होते. दोन-तीन महिन्यांतून एकदा घरी पैसेही पाठवीत होते. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आले. रेल्वे, बस आणि सर्वच खासगी वाहतूक बंद झाली. फरसानचे दुकानही बंद झाले. त्यामुळे ते कामाच्या ठिकाणी थांबले. आज गुरुवारी त्यांना आजीच्या निधनाची बातमी समजली. अंत्यदर्शनाला जाण्यासाठी त्यांनी बॅग भरल्या आणि रेल्वेस्थानक गाठले. दुपारी ३.३० वाजता ते रेल्वेस्थानकावर पोहचले. त्यांनी रेल्वे सुरक्षा दल आणि लोहमार्ग पोलिसांना आपली अडचण सांगितली. त्यानंतर ते उपस्टेशन व्यवस्थापक सतीश ढाकणे यांना भेटले. रेल्वेगाड्या बंद असल्या तरी मालगाडी हा एकमेव पर्याय होता. परंतु पुढील अनेक तास मालगाडीही नसल्यामुळे त्यांना मदत करणे शक्य झाले नाही. त्यामुळे जड अंत:करणाने ते रेल्वेस्थानकाच्या बाहेर पडले. यावेळी रेल्वेस्थानकावर उपस्थित लोहमार्ग पोलीस, रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी असा प्रसंग कुणावरही येऊ नये, अशा भावना व्यक्त केल्या.

टॅग्स :Deathमृत्यूNagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूर