शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरला सर्वोत्तम शहर करण्यासाठी प्रयत्न

By admin | Updated: January 28, 2015 01:02 IST

नागपूर शहराचा विकास सर्वोत्तम शहर म्हणून करण्याचे प्रयत्न केंद्र व राज्य शासनाकडून केले जात आहेत, असे प्रतिपादन पालकमंत्री व राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी केले.

पालकमंत्री: प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रमनागपूर: नागपूर शहराचा विकास सर्वोत्तम शहर म्हणून करण्याचे प्रयत्न केंद्र व राज्य शासनाकडून केले जात आहेत, असे प्रतिपादन पालकमंत्री व राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी केले.सोमवारी कस्तूरचंद पार्कवर झालेल्या प्रजासत्ताक दिन वर्धापन दिनाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमात ते बोलत होते. पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यावर त्यांना विविध महाविद्यालयाच्या पथकांनी परिविक्षाधीन पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्त्वाखाली सलामी दिली. यावेळी विभागीय आयुक्त अनुपकुमार,पोलीस आयुक्त के.के.पाठक, जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा उपस्थित होते.नागपूरला देशात विकासाच्या क्षेत्रात क्रमांक एकचे शहर बनविण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. मिहान प्रकल्पाला चालना देण्याचे सर्वोत्परी प्रयत्न असून ‘मेक इन महाराष्ट्र’ची सुरुवात मुख्यमंत्र्यांनी नागपूर येथे बुटीबोरीमध्ये सीएट टायर्स कंपनीच्या प्रकल्पाला परवानगी देऊन यापूर्वीच केली. केंद्र शासनाने नागपूरसाठी ‘आयआयएम’आणि ‘एम्स’ला मंजुरी दिली आहे. ‘नॅशनल लॉ स्कूल’साठी काळडोंगरी येथे ७० एकर जागा निश्चित करण्यात आली आहे, असे बावनकुळे म्हणाले.कार्यक्रमात राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त पोलीस अधीक्षक शशिकांत माने, निताराम कुमरे, बळीराम जिवतोडे, दामोदार प्रसाद सिंह, के. दुबे, सच्चीदानंद रॉय, केशव मोरे, स्वप्निल नरवाडे आदी अधिकाऱ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. मंदा वैरागडे, गीता श्रीवास, वीणा खानोरकर, विशाखा पोटे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी पुरस्कार तर नागराज खुरसने, राधा देशमुख,संदीप खोब्रागडे, विजय डांगरे यांना जिल्हा क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाला आमदार जोगेंद्र कवाडे, डॉ. मिलिंद माने,आशिष देशमुख, जि.प. अध्यक्ष निशा सावरकर, उपाध्यक्ष शरद डोणेकर, माजी खासदार गेव्ह आवारी, माजी आमदार अनुक्रमे एस.क्यु. जमा, व्हिक्टर फ्रेटस, यादवराव देवगडे नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती श्याम वर्धने, जि.प.चे मुख्य कार्यपालन अधिकारी शिवाजीराव जोंधळे यांच्यासह स्वातंत्र्य संग्राम सैनिक, ज्येष्ठ नागरिक तसेच विविध शाळा व महाविद्यालयांचे विद्यार्थी कार्यक्रमाला उपस्थित होते. (प्रतिनिधी)