शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
KKR चे 'वैभव'! असा भारी चेंडू टाकला की फलंदाजाला चकवून फक्त १ बेल्स उडवून गेला, Video 
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

भारताच्या स्वातंत्र्यात आझाद हिंद सेनेचे खरे योगदान : जी. डी. बक्षी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 10:21 PM

भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात आझाद हिंद सेनेचे २६ हजार सैनिक शहीद झाले. त्यांच्यामुळेच भारताला स्वातंत्र्य मिळाले. परंतु आम्हाला ‘विना खड्ग, विना ढाल’ स्वातंत्र्य मिळाले असे म्हणण्यात येते. असे म्हणताना आम्हाला शरम वाटली पाहिजे, असे प्रतिपादन मेजर जनरल जी. डी. बक्षी यांनी आज येथे केले.

ठळक मुद्देस्वा. सावरकर सामाजिक अभिसरण पुरस्कार प्रदान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात आझाद हिंद सेनेचे २६ हजार सैनिक शहीद झाले. त्यांच्यामुळेच भारताला स्वातंत्र्य मिळाले. परंतु आम्हाला ‘विना खड्ग, विना ढाल’ स्वातंत्र्य मिळाले असे म्हणण्यात येते. असे म्हणताना आम्हाला शरम वाटली पाहिजे, असे प्रतिपादन मेजर जनरल जी. डी. बक्षी यांनी आज येथे केले.स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक समिती नागपूरच्या वतीने लक्ष्मीनगरच्या सायंटिफिक सभागृहात स्वा. सावरकर सामाजिक अभिसरण पुरस्कार पुरुषोत्तम मार्तंडराव उपाख्य बापू जोग आणि मीना जोग तसेच तेजस्विनी महिला गौरव पुरस्कार जिज्ञासा कुबडे यांना प्रदान करण्यात आला. अध्यक्षस्थानी स्वा. सावरकर स्मारक समितीचे अध्यक्ष चंद्रकांत लाखे होते. व्यासपीठावर डॉ. अजय कुळकर्णी, सत्कारमूर्ती पुरुषोत्तम उपाख्य बापू जोग, मीना जोग, जिज्ञासा कुबडे उपस्थित होत्या. मेजर जनरल जी. डी. बक्षी म्हणाले, इंग्रजांनी भारतीयांना जाती-धर्मात विभागले. भारताने ८०० वर्षे गुलामगिरी सहन केली. शिवाजी महाराजांनी मुगलसाम्राज्य उखडून फेकले. राणी लक्ष्मीबार्इंनी हातात तलवार घेऊन शत्रूंचा बीमोड केला. अखेर इंग्लंडच्या राणीला त्यांच्याच सैन्याने पत्र लिहून आझाद हिंद सेनेमुळे भारतापुढे आपला टिकाव लागणार नसल्याची ताकीद दिली. याची इतिहासात नोंद आहे. इंग्रजांनी भारतात सत्तेचे हस्तांतर नेहरू घराण्यास केले. खरे पाहिले तर आझाद हिंद सेनेकडे भारताची सत्ता सोपवायला हवी होती. सत्तेवर येताच पहिला गव्हर्नर इंग्रज नेमण्यात आला. त्याने आझाद हिंद सेनेवर बंदी घालून त्यांना सैन्यात येण्यास मनाई केली. त्यांची पेन्शन रोखली. आजपर्यंतच्या ७२ वर्षातील निवडणुका जातीच्या आधारावर झाल्या. परंतु पहिल्यांदा भारतात राष्ट्रवादावर निवडणुका झाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आझाद हिंद सेनेच्या चार जवानांचा राजपथावर सत्कार केला.सावरकरांचे अखंड भारताचे स्वप्न आज साकार होत असल्याचे बक्षी म्हणाले. सत्काराला उत्तर देताना बापू जोग यांच्यावतीने वि. स. जोग म्हणाले, सावरकरांचे लहानपणापासून संस्कार झाले. त्यांच्या विचारांमुळेच आंतरजातीय विवाह केला. पुढील महिन्यात विवाहाला ५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्याचे श्रेय पत्नी आणि आईला जाते. जिज्ञासा कुबडे म्हणाल्या, सावरकरांच्या नावाचा पुरस्कार मिळाल्याचा आनंद आहे. समाजकार्यात कुटुंबीय, समाजातील नागरिकांनी मदत केली. समाजाने दिव्यांगांची क्षमता ओळखून त्यांना संधी देण्याचे आवाहन त्यांनी केले. प्रास्ताविक अजय कुळकर्णी यांनी केले. संचालन डॉ. दिनेश खुर्गे यांनी केले. आभार अनिल देव यांनी मानले. कार्यक्रमाला आमदार डॉ. अनिल सोले, उपेंद्र कोठेकर यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Vinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकरScientific Hall, Nagpurसायंटिफिक सभागृह