भरधाव ट्रकची दुचाकीला धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:11 IST2021-01-19T04:11:01+5:302021-01-19T04:11:01+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क खापरखेडा : भरधाव ट्रकने समोरून येणाऱ्या ॲक्टिव्हाला जाेरात धडक दिली. त्यात एकाचा मृत्यू झाला तर अन्य ...

The truck hit the two-wheeler | भरधाव ट्रकची दुचाकीला धडक

भरधाव ट्रकची दुचाकीला धडक

लाेकमत न्यूज नेटवर्क

खापरखेडा : भरधाव ट्रकने समोरून येणाऱ्या ॲक्टिव्हाला जाेरात धडक दिली. त्यात एकाचा मृत्यू झाला तर अन्य एक गंभीर जखमी झाला. ही घटना खापरखेडा (ता. सावनेर) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील वारेगाव-सुरादेवी राेडवर साेमवारी (दि. १८) सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास घडली.

उमेश काशिनाथ राऊत (२१) असे मृताचे तर वैभव सिद्धार्थ गजभिये (२२) असे गंभीर जखमीचे नाव असून, दाेघेही बिना संगम, ता. कामठी येथील रहिवासी आहेत. ते एमएच-४०/एझेड-१७०७ क्रमांकाच्या ॲक्टिव्हाने सुरादेवी (ता. कामठी) येथून बिना संगम येथे घराकडे जात हाेते. उमेश ॲक्टिव्हा चालवीत हाेता. दरम्यान, विरुद्ध दिशेने वेगात आलेल्या एमएच-४०/एके-६७१३ क्रमांकाच्या ट्रकने त्यांच्या ॲक्टिव्हाला जाेरात धडक दिली.

त्यात गंभीर दुखापत झाल्याने उमेशचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर वैभव गंभीर जखमी झाला. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून वैभवला उपचारासाठी तर उमेशचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नागपूर येथील मेडिकल हाॅस्पिटलमध्ये पाठविला. धडकेमुळे ॲक्टिव्हा ट्रकमध्ये फसली हाेती. ती काढण्यासाठी पाेलिसांना दाेन तास प्रयत्न करावे लागले. हा ट्रक काेराडी (ता. कामठी) येथील असल्याची माहिती काही जाणकार व्यक्तींनी दिली. याप्रकरणी खापरखेडा पाेलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Web Title: The truck hit the two-wheeler