शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
2
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
3
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
4
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
5
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
6
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
7
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
8
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
9
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
10
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
11
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
12
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
13
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
14
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
15
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
16
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
17
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
18
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
19
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
20
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
Daily Top 2Weekly Top 5

देशी कट्ट्याच्या धाकावर ट्रकचालकास लुटले

By admin | Updated: August 15, 2016 02:01 IST

दुचाकीवरून आलेल्या चौघांनी देशी कट्ट्याच्या धाकावर ट्रकचालकास लुटले. ही घटना मौदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोरगाव शिवारात शनिवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली.

चौघांना अटक : मौदा अंतर्गतच्या बोरगाव शिवारातील घटना मौदा : दुचाकीवरून आलेल्या चौघांनी देशी कट्ट्याच्या धाकावर ट्रकचालकास लुटले. ही घटना मौदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोरगाव शिवारात शनिवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. यात पोलिसांनी सदर चारही आरोपींना अटक केली असून यामध्ये एका विधिसंघर्षग्रस्त बालकाचा समावेश आहे. गुरुदेवसिंग ऊर्फ फिरकी बलविंदर सिंग (२५, रा. मुस्ताफाबाद, ता. बताळा, जि. गुरुदासपूर, पंजाब), विलास मूलचंद येळणे (१९, रा. तेलीमांगली, मौदा), गुरूमितसिंग बिंदर सिंग (२०, रा. सुधारा, जि. अमृतसर, ह.मु. मौदा) आणि एक विधिसंघर्षग्रस्त बालक, अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. फिर्यादी प्रवीण हरिदास जामुनकर (३६, रा. आदर्शनगर, नागपूर) हा एमएच-४०/एएफ-६१७६ क्रमांकाच्या ट्रकने रायपूरकडून नागपूरकडे येत होता. दरम्यान, बोरगाव शिवारात ट्रकचालक प्रवीण व क्लिनर हे दोघेही ट्रक रस्त्याच्या कडेला उभा करून शौचास गेले. दरम्यान, एमएच-३१/सीसी-९०३७ क्रमांकाच्या पल्सर दुचाकीने आलेल्या चौघांनी ट्रकचालक व क्लिनरला देशी कट्टा व चाकूचा धाक दाखवून पैशांची मागणी करू लागले. ट्रकचालक प्रवीणने भीतीपोटी ट्रकच्या कॅबिनमधून आठ हजार रुपये काढून आरोपींना दिले. त्यानंतर चारही आरोपींनी तेथून पळ काढला. लागलीच ट्रकचालक प्रवीणने टोल फ्री क्रमांक १०० वरून पोलिसांना घटनेबाबत सूचना दिली. याबाबत माहिती मिळताच, मौदा पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला. दरम्यान, पोलिसांनी आरोपींचा पाठलाग करीत कढोली शिवारात चारही आरोपींना ताब्यात घेतले. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून मौदा पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंविच्या कलम ३९२, ३४ सहकलम ३, २५ भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा नोंदवून आरोपींना अटक केली आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक किशोर धोपडे करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)