रामटेकमध्ये त्रिपुरारी पाैर्णिमा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:08 IST2020-12-02T04:08:46+5:302020-12-02T04:08:46+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : दिवाळीचे खास वैशिष्ट्य म्हणजे रामटेक येथे दिवाळी सण कार्तिक पाैर्णिमेला साजरा केला जाताे. काेराेना ...

Tripurari Parnima in Ramtek in excitement | रामटेकमध्ये त्रिपुरारी पाैर्णिमा उत्साहात

रामटेकमध्ये त्रिपुरारी पाैर्णिमा उत्साहात

लाेकमत न्यूज नेटवर्क

रामटेक : दिवाळीचे खास वैशिष्ट्य म्हणजे रामटेक येथे दिवाळी सण कार्तिक पाैर्णिमेला साजरा केला जाताे. काेराेना संकटामुळे यंदा रामटेक येथील सर्व उत्सवांना ब्रेक लावला. मात्र त्रिपुरारी पाैर्णिमेनिमित्त निवडक पुजाऱ्यांच्या उपस्थितीत गडमंदिराच्या कळसावर त्रिपूर जाळला गेला. फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. ‘जय श्रीराम’च्या जयघाेषाने परिसर निनादला हाेता.

वैकुंठ चतुर्दशीला निघणाऱ्या रामटेकच्या शाेभायात्रेचा महाराष्ट्रात नावलाैकिक आहे. या यात्रेसाठी मध्य प्रदेश, छत्तीसगड येथून माेठ्या प्रमाणावर भाविक व कलावंत रामटेकला येतात. यंदा जनसेवा मंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना पाच झाँकी काढण्याची परवानगी मागितली हाेती. परंतु गर्दीच्या कारणामुळे प्रशासनाने परवानगी नाकारली. याबाबत उपविभागीय अधिकारी जाेगेंद्र कट्यारे यांनी तहसील कार्यालयात संबंधित पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन शासननिर्णयाची माहिती दिली.

रामटेकची शाेभायात्रा ३९ वर्षानंतर खंडित झाली असली तरी ज्या ठिकाणाहून ही शाेभायात्रा निघत हाेती. त्या अठराभुजा गणपती मंदिरात पूजा-अर्चना करण्यात आली. स्व. गाेपालदास महाराजांच्या प्रतिमेला वंदन करण्यात आले.

गडमंदिरावरील राम-लक्ष्मणाच्या मंदिरात त्रिपुरारी पाैर्णिमेला माेठा उत्सव असताे. मात्र यंदा काही निवडक भाविकांच्या उपस्थितीत रात्री १२ वाजता मंदिराच्या कळसावर त्रिपूर जाळण्यात आला. फटाक्यांची आतषबाजी आणि ‘जय श्रीराम’च्या जयघाेषाने परिसर निनादला हाेता. शहरातील नागरिकांनी आपापल्या घराच्या छतावरून त्रिपुराचा आनंद लुटला.

त्रिपुरारी पाैर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी कार्तिक पाैर्णिमेला शहरात मंडईचा कार्यक्रम असताे. दंडार, तमाशा, नाटक कलाकार आपली कला दाखवून नागरिकांचे मनाेरंजन करतात. या कार्यक्रमांना नगरपालिका बक्षीस देते. परंतु यावर्षी मंडई नसल्याने या कलावंतांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. २८ ते ३० नाेव्हेंबरदरम्यान रामटेक येथे कुठल्याही कार्यक्रमाला परवानगी नसल्याने रस्ते सामसूम हाेते. ठाणेदार दिलीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनात पाेलिसांचा चाेख बंदाेबस्त हाेता. उपविभागीय अधिकारी जाेगेंद्र कट्यारे, तहसीलदार बाळासाहेब मस्के यांनी सर्व व्यवस्था चाेख सांभाळली. शहरात हाेणारा तीन दिवसीय उत्सव शांततेत पार पडला.

Web Title: Tripurari Parnima in Ramtek in excitement