शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

श्रीनगर विमानतळावर फडकविला तिरंगा

By admin | Updated: August 19, 2016 02:40 IST

जम्मू-काश्मीरमधील फुटीरवाद्यांच्या मनात राष्ट्रभक्ती निर्माण व्हावी या हेतूने नागपुरातील तरुणांनी १५ आॅगस्ट रोजी

नागपुरातील दहा युवकांचा पुढाकार नागपूर : जम्मू-काश्मीरमधील फुटीरवाद्यांच्या मनात राष्ट्रभक्ती निर्माण व्हावी या हेतूने नागपुरातील तरुणांनी १५ आॅगस्ट रोजी श्रीनगर विमानतळावर तिरंगा फडकविला. मात्र यावेळी त्यांना फुटीरवाद्यांच्या घोषणाबाजीचा सामना करावा लागला. या विशेष अभियानासाठी मागील १० आॅगस्ट रोजी नागपुरातील १० तरुण जम्मू-काश्मीरसाठी रवाना झाले होते. यानंतर त्यांनी केंद्रीय गृह मंत्रालयाची परवानगी प्राप्त केली. तसेच जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांना परवानगीसाठी पत्र पाठविले होते. तरुणांच्या या पथकाचे प्रमुख बाबा मेंढे यांच्या मते, ज्यावेळी त्यांचे पथक श्रीनगर विमानतळावर पोहोचले, त्यावेळी तेथे कलम १४४ लागू करण्यात आले होते. त्यामुळे त्यांना बाहेर जाऊ देण्यात आले नाही. अशा स्थितीत सर्व तरुणांनी विमानतळावरच तिरंगा फडकवून राष्ट्रगीत म्हटले. तरुणांच्या या पथकात अहमदाबाद येथील तन्जुम इरानी आणि शकील सैफी यांच्यासह देशभरातील शेकडो तरुणांचा समावेश होता. दरम्यान विमानतळावरील सीआयएसएफच्या जवानांनी श्रीनगरमधील परिस्थिती फार तणावपूर्ण असल्याचे सांगितले. मात्र देशभरातून पोहोचलेल्या या तरुणांनी विचलित न होता, विमानतळावर तिरंगा फडकवून ‘वंदेमातरम्’ च्या जोरदार घोषणा दिल्या. (प्रतिनिधी)