शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

शॉर्ट सर्किटमुळे ट्रकला आग

By admin | Updated: October 23, 2016 02:48 IST

आॅईल घेऊन जात असलेल्या ट्रकमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने ट्रकला आग लागली.

५६ लाखांचे नुकसान : नीलज गावालगतची घटनाकन्हान : आॅईल घेऊन जात असलेल्या ट्रकमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने ट्रकला आग लागली. ट्रक भस्मसात होऊन सुमारे ५६ लाखांचे नुकसान झाले. ही घटना कन्हाननजीकच्या नीलज गावालगत शुक्रवारी मध्यरात्री १२.३० वाजताच्या सुमारास घडली. एमएच-१७/एचएच-२७२९ क्रमांकाचा ट्रक भिवंडीहून पटणा, बिहारकडे आॅईल घेऊन जात होता. धावत्या ट्रकचा समोरील टायर फुटल्याने भरधाव ट्रक मार्गालगतच्या बाभळीच्या झाडावर आदळला. यात सदर ट्रकमध्ये अचानक शॉर्ट सर्किट झाल्याने आगीचा भडका उडाला. काही क्षणातच ट्रकमधील आॅईलने पेट घेतल्याने आगीचे लोळ वाढून संपूर्ण ट्रक भस्मसात झाला. सदर ट्रकमध्ये ४१ लाख ८ हजार ८५१ रुपये किमतीच्या आॅईलची वाहतूक केली जात होती. ट्रकची आग विझविण्याचे कार्य शनिवारी सकाळपर्यत सुरू होते. या घटनेत ट्रक व आॅईलसह तब्बल ५६ लाख ८ हजार ८५१ रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. (शहर प्रतिनिधी)