शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
3
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
4
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
5
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
6
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
7
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
8
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
9
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
10
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
11
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
12
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
13
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
14
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
15
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
16
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
17
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
18
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
19
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
20
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!

नागपूर जिल्ह्यातील ४१ गावांचा होणार कायापालट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 20:43 IST

राज्यातील शहरी भागाचा झपाट्याने विकास होत आहे. परंतु गेल्या काही वर्षात राज्यात पडलेला दुष्काळ, कृषी उत्पादनामध्ये अनियमितता आल्यामुळे ग्रामीण जनतेचे राहणीमान तणावाखाली आहे. मागास भागातील खेड्यांचा आर्थिक आणि सामाजिक विकास साधण्यासाठी शासनाने ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान राबविले आहे. यात नागपूर जिल्ह्यातील ४१ गावांचा समावेश असून, या अभियानात शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याबरोबरच गावाचा विकास व बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

ठळक मुद्देग्राम सामाजिक परिवर्तन अभियानात समावेश : युवकांनाही मिळणार रोजगार

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्यातील शहरी भागाचा झपाट्याने विकास होत आहे. परंतु गेल्या काही वर्षात राज्यात पडलेला दुष्काळ, कृषी उत्पादनामध्ये अनियमितता आल्यामुळे ग्रामीण जनतेचे राहणीमान तणावाखाली आहे. मागास भागातील खेड्यांचा आर्थिक आणि सामाजिक विकास साधण्यासाठी शासनाने ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान राबविले आहे. यात नागपूर जिल्ह्यातील ४१ गावांचा समावेश असून, या अभियानात शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याबरोबरच गावाचा विकास व बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार आहे.शासनाने दोन वर्षासाठी हे अभियान हाती घेतले आहे. यात नागपूर जिल्ह्यातील रामटेक व पारशिवनी तालुक्यातील दुर्गम भागातील गावांचा समावेश करण्यात आला आहे. ग्रामीण भागात कौशल्य विकासावर आधारीत उपक्रम राबवून बेरोजगारांना रोजगार देण्याचा तसेच आवश्यक असलेल्यांना घरकूल उपलब्ध करून देण्याची जबाबदारी जि.प.च्या ग्रामीण विकास यंत्रणेला दिली आहे. शासनाची यंत्रणा व स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून हे अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाला शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर यांनी रामटेक भागात मेळावा घेऊन, मोठ्या संख्येने युवकांना यात सहभागी करून घेतले. या संपूर्ण अभियानावर जिल्हाधिकाऱ्यांचे नियंत्रण आहे. प्रत्येक पंधरवड्यात अभियानाच्या प्रगतीचा आढावा घेतला जाणार आहे. योजनेची आर्थिक उद्दिष्टे

  • शेतक ऱ्यांचे  उत्पन्न दुप्पट करणे
  • पिकांच्या प्रति हेक्टरी उत्पादनात सुधार करणे
  • कुटुंबांना दारिद्र्यरेषेवर आणणे
  • ग्रामीण युवकांना कौशल्य प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करून देणे

सामाजिक उद्दिष्ट

  • कुटुंबांना पक्की घरे बांधून देणे
  • शुद्ध व सुरक्षित पाणीपुरवठा करणे
  • सिंचनासाठी पाणीपुरवठा करणे

 मानवी विकास उद्दिष्ट

  • बालमृत्यू दरात लक्षणीय घट करणे
  • आरोग्य व स्वच्छतेचा दर्जा सुधारणे
  • शिक्षणाच्या क्षेत्रात सुधारणा करणे

 गावांची निवडरामटेक : बांद्रा, गर्रा, खुर्सापार, डोंगरगाव, खडगीखेडा, कामठी, सावरा, उसरीपार, सावरा, जमुनिया, टुयापार, फुलझरी, खापा, पिपरिया, सालई, सिल्लारी, तोतलाडोहपारशिवनी : बोरी, रमजान, सालई, अंबाझरी, मकरधोकडा, सालेघाट, सिलादेवी, सुवरधरा, गारगोटी, पारडी, घाटपेंढरी, किरंगीसर्रा, कोलितमारा, मेहकेपार

टॅग्स :Rural Developmentग्रामीण विकासnagpurनागपूर