रेल्वेची चाक रुळावरून घसरली; शहडोल - नागपूर एक्सप्रेसचा मोठा अपघात टळला
By नरेश डोंगरे | Updated: March 13, 2026 15:23 IST2026-03-13T15:16:41+5:302026-03-13T15:23:49+5:30
Nagpur : केवलारी तालुक्यातील खैररांजी गावाजवळ शुक्रवारी मोठा रेल्वे अपघात टळला. शहडोलहून नागपूरकडे येत असलेल्या शहडोल–नागपूर एक्सप्रेसच्या काही डब्यांची चाके नैनपूर–खैररांजी दरम्यान अचानक रुळावरून घसरली.

Train wheel derails; Shahdol-Nagpur Express averts major accident
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केवलारी तालुक्यातील खैररांजी गावाजवळ शुक्रवारी मोठा रेल्वे अपघात टळला. शहडोलहून नागपूरकडे येत असलेल्या शहडोल–नागपूर एक्सप्रेसच्या काही डब्यांची चाके नैनपूर–खैररांजी दरम्यान अचानक रुळावरून घसरली. दुपारी सुमारे १२:३० वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे ट्रेनला जोराचा धक्का बसला आणि प्रवाशांमध्ये काही काळ घबराट पसरली.
मात्र सुदैवाने या घटनेत प्रवासी गंभीर जखमी झाल्याची माहिती नाही. घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारी आणि तांत्रिक पथक घटनास्थळी रवाना झाले असून, ट्रेन पुन्हा रुळावर आणण्याचे तसेच मार्ग सुरळीत करण्याचे काम सुरू आहे.