शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे प्रवाशांना मिळणार शुद्ध पाणी  : रेल नीर बॉटलिंग प्लान्ट सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 21:42 IST

रेल्वेगाड्यात सीलबंद पाण्याच्या बाटल्यांची मागणी वाढल्यामुळे किमतीपेक्षा अधिक दराने पाण्याच्या बॉटलची विक्री होत होती. परंतु आता प्रवाशांची गैरसोय दूर झाली असून त्यांना अधिक पैसे मोजण्याची गरज भासणार नाही. बुटीबोरीत आयआरसीटीसीचा रेल नीर बॉटलिंग प्लान्ट सुरू झाला आहे.

ठळक मुद्देप्रवाशांची गैरसोय झाली दूर

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : रेल्वेगाड्यात सीलबंद पाण्याच्या बाटल्यांची मागणी वाढल्यामुळे किमतीपेक्षा अधिक दराने पाण्याच्या बॉटलची विक्री होत होती. परंतु आता प्रवाशांची गैरसोय दूर झाली असून त्यांना अधिक पैसे मोजण्याची गरज भासणार नाही. बुटीबोरीत आयआरसीटीसीचा रेल नीर बॉटलिंग प्लान्ट सुरू झाला आहे. या प्लान्टमधून दिवसाकाठी १४ हजारांपेक्षा अधिक बॉटल्स उपलब्ध होऊन त्यांचा पुरवठा करण्यात येत आहे.रेल्वे प्रवासादरम्यान प्रवासी बाटलीबंद पाण्याला प्राधान्य देतात. रेल्वे प्रशासनाने मोजक्या कंपन्यांनाच पाणी विक्रीची परवानगी दिलेली आहे. परंतु मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी होत नसल्याने प्रवाशांना पाण्याच्या बाटलीसाठी अधिक पैसे मोजावे लागत होते. प्रवाशांना मुबलक प्रमाणात आणि योग्य किमतीत पाणीपुरवठा करण्यासाठी तसेच बाटलीबंद पाण्याच्या काळाबाजाराला आळा घालण्यासाठी २०१३-१४ मध्ये तत्कालीन रेल्वेमंत्री पवन बंसल यांनी नागपूर विभागाअंतर्गत रेल नीर प्लान्टची घोषणा केली होती. ८ कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या या प्लान्टमधून दररोज ७२ हजार लिटर पाणी तयार करण्याची क्षमता आहे. आॅक्टोबर २०१७ या वर्षातच हा प्रकल्प तयार होणार होता. मात्र, तांत्रिक कारणामुळे ते शक्य होऊ शकले नाही. नंतर आॅक्टोबर २०१८ मध्ये प्रकल्प पूर्ण करण्याचे ध्येय होते. त्यातही उशीर झाला. अखेर २०१९ च्या शेवटी हा प्रकल्प पूर्ण करण्यात विभागाला यश मिळाले. सद्य:स्थितीत याच प्लान्टमधून नागपूर रेल्वेस्थानकावर बाटलीबंद पाणीपुरवठा केला जात आहे.नागपूरसाठी ७०० पेट्यानागपूर रेल्वेस्थानकावर दररोज ३५ ते ४० हजार प्रवाशांची वर्दळ असते. दररोज ७०० पेटी पाण्याची गरज भासते. एका पेटीत एक लिटरच्या २४ बाटल्या असतात. उन्हाळ्यात पाण्याची मागणी दुपटीने वाढल्यास पाण्याचा काळाबाजार व्हायचा. आता रेल नीर प्लाँट सुरू झाल्याने यावर आळा बसणार आहे. भारतीय रेल्वेत रेल नीरचेच पाणी वापरावे, असे निर्देश आहेत. विशेष म्हणजे रेल नीरचा प्रकल्प बिलासपूरला आहे. तेथूनच नागपूरसाठी पाणी मागविल्या जायचे. उन्हाळ्यात पाण्याची मागणी वाढल्यास मागणीच्या तुलनेत पाहिजे तसा पुरवठा होत नव्हता. आता नागपुरातच प्लान्ट सुरू झाल्याने बिलासपूरहून पाणी मागविण्याची गरज नाही.

टॅग्स :railwayरेल्वेWaterपाणी