शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

जयपूरच्या त्रिमूर्तीने सुशिक्षित बेरोजगारांना फसवले

By admin | Updated: August 7, 2015 02:51 IST

जयपूरच्या मे. एश्युअल प्लेसमेंट कंपनीच्या त्रिमूर्तीने अनेक शहरातील उच्चशिक्षित विद्यार्थ्यांना चुना लावला असल्याची बाब प्राथमिक चौकशीत उघडकीस आली आहे.

पोलिसांचा तपास सुरू: अनेक शहरांमध्ये पसरले आहे जाळे नागपूर : जयपूरच्या मे. एश्युअल प्लेसमेंट कंपनीच्या त्रिमूर्तीने अनेक शहरातील उच्चशिक्षित विद्यार्थ्यांना चुना लावला असल्याची बाब प्राथमिक चौकशीत उघडकीस आली आहे. एश्युअल प्लेसमेंटचे आरोपी संचालक सुमित छाबरा, गिरीश बन्सल आणि विपुल भारद्वाज याच्या शोधासाठी अंबाझरी पोलीस जयपूरला जात आहे. अंबाझरी पोलिसांनी बुधवारी या तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. रामनगर चौक येथील एम. के. प्लेसमेंटचे संचालक आशिष गजभिये यांनी यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीनुसार नोव्हेंबर २०१३ मध्ये आरोपी सुमित छाबरा याने त्यांच्याशी संपर्क साधला होता. त्याने गिरीश व विपुलला जयपूर, उज्जैन आणि बंगलुरु येथे ५० ते ७० इंजिनियरची आवश्यकता असल्याचे सांगितले होते. निवड करण्यासाठी सेवा शुल्क घेतले जाईल असेही सांगितले होते. त्यानुसार एम.के. प्लेसमेंटने सुमितशी करार केला. त्यानुसार कॅम्पस इंटरह्यू घेऊन ४० उमेदवारांची निवड करण्यात आली. सुमित आणि त्याच्या साथीदारांनी विद्यार्थ्यांना ‘आॅफर लेटर’ देऊन जुलैमध्ये इंजिनियरिंगचा अंतिम निकाल आल्यावर नियुक्ती देण्याचे आश्वासन दिले. परंतु निकाल लागल्यावरही नियुक्ती दिली नाही. दरम्यान इतर शहरातील विद्यार्थ्यांनाही अशाच प्रकारे फसवण्यात आल्याचे लक्षात आल्याने एप्रिल महिन्यात आशिष गजभिये यांनी आरोपीच्या विरुद्ध तक्रार दाखल केली. गुरुवारच्या अंकात नकळतपणे एम.के. प्लेसमेंट अ‍ॅण्ड एज्युकेशन सर्व्हिसेस ही आरोपीची असल्याचे सांगण्यात आले होते. (प्रतिनिधी)