दुर्मिळ पक्ष्यांची तस्करी पकडली

By Admin | Updated: August 21, 2016 03:14 IST2016-08-21T03:14:31+5:302016-08-21T03:14:31+5:30

वन तस्कारांनी ‘जय’चे तस्कारी केल्याचा आरोप होत असतानाच शनिवारी नागपूर रेल्वेस्थानकावर रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ)

Trafficking of rare birds | दुर्मिळ पक्ष्यांची तस्करी पकडली

दुर्मिळ पक्ष्यांची तस्करी पकडली

आरोपी फरार : आरपीएफची कारवाई
नागपूर : वन तस्कारांनी ‘जय’चे तस्कारी केल्याचा आरोप होत असतानाच शनिवारी नागपूर रेल्वेस्थानकावर रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) दुर्मिळ प्रजातीच्या आठ पक्ष्यांची तस्करी उघडकीस आणली. या तस्करीतील आरोपी फरार झाले असून ही घटना नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक २ वर घडली. नंतर जप्त करण्यात आलेले पक्षी वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आले आहेत.
रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योती कुमार सतीजा यांना दानापूर-सिकंदराबाद एक्स्प्रेसमधून दुर्मिळ प्रजातीच्या पक्ष्यांची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती मिळाली.
मिळालेल्या माहितीनुसार कमांडंट ज्योती कुमार सतीजा यांच्या मार्गदर्शनाखाली आरपीएफचे निरीक्षक वीरेंद्र वानखेडे, उपनिरीक्षक कृष्णा नंद राय, आरपीएफचा जवान विकास शर्मा, विनोद राठोड, बिक्रम यादव, किशोर चौधरी यांनी रेल्वेगाडी क्रमांक १२७९२ दानापूर-सिकंदराबाद एक्स्प्रेसची तपासणी केली. यावेळी एस १२ कोचमध्ये बर्थ क्रमांक ७, ८ च्या खाली दोन प्लॉस्टिकच्या बॅगमध्ये हे आठ पक्षी आढळले. आजूबाजूच्या प्रवाशांना विचारणा केली असता कुणीच हक्क सांगितला नाही. तस्करीसाठी नेण्यात येत असलेल्या पक्ष्यात पाच मोठे आणि तीन दुर्मिळ प्रजातीच्या पक्ष्यांचा समावेश आहे. आरपीएफच्यावतीने याबाबत वन विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आली. वन विभागाचे अधिकारी रमेश आदमने, वनपाल ललित गेडाम, अनिल खडोदकर, मंगेश इनवाते यांनी आरपीएफ ठाण्यात येऊन या पक्ष्यांना ताब्यात घेतले. रेल्वे सुरक्षा दलाने याबाबत इंटरनेटवर शोध घेतला असता यातील तीन पक्षांची ओळख पटविण्यात यश आले. यातील दोन पक्षी प्लम हेडेड पॅरेट असून याची किंमत १० हजार रुपये जोडी आहे तर एक पक्षी बोलणारी कॉमनहिल मैना असून आंतरराष्ट्रीय बाजारात तिची किंमत १५०० डॉलर म्हणजे १ लाख रुपये आहे. इतर पाच पक्ष्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. (प्रतिनिधी)

Web Title: Trafficking of rare birds