रस्त्याशेजारील झुडूपात नेऊन अत्याचार, फोटो व्हायरल करण्याची धमकी

By योगेश पांडे | Updated: October 13, 2023 16:30 IST2023-10-13T15:59:39+5:302023-10-13T16:30:02+5:30

हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना

Tortured by being taken to a bush beside the road, threatened to spread the photo virally | रस्त्याशेजारील झुडूपात नेऊन अत्याचार, फोटो व्हायरल करण्याची धमकी

रस्त्याशेजारील झुडूपात नेऊन अत्याचार, फोटो व्हायरल करण्याची धमकी

नागपूर : एका अल्पवयीन मुलीला मैत्रीच्या जाळ्यात ओढत फिरायला नेण्याच्या बहाण्याने तिच्यावर अत्याचार करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. त्याने रस्त्याशेजारील झुडूपात तिच्यावर अत्याचार केले व त्यानंतर फोटो व्हायरल करण्याची धमकी देत पावणेदोन वर्ष सातत्याने तिचा छळ केला. हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

कार्तिक कृपावंत नागपुरे (२२, हिंगणा) असे आरोपीचे नाव आहे. त्याची हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतच राहणाऱ्या १७ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीशी ओळख झाली. त्याने तिला मैत्रीच्या जाळ्यात ओढले. आपण लॉंग राईडला जाऊ असे म्हणत त्याने १४ जानेवारी २०२२ रोजी तिला गाडीवर बसविले आणि एका निर्जन रस्त्यावर नेऊन गाडी थांबविली. तो तिला रस्त्याशेजारी असलेल्या झुडूपात घेऊन गेला व तेथे तिच्यावर अत्याचार केला. त्याने त्यावेळी तिचे फोटोदेखील काढले. ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देत त्याने ८ ऑक्टोबरपर्यंत तिच्यावर वारंवार अत्याचार केले. त्याचा छळ वाढल्याने अखेर विद्यार्थिनीने घरच्यांना हा प्रकार सांगितला. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी कार्तिकविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

Web Title: Tortured by being taken to a bush beside the road, threatened to spread the photo virally