शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
2
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
3
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
4
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
5
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
6
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
7
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
8
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
9
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
10
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
11
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
12
PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद, अग्रगण्य कंपनीचा मोठा निर्णय; 'अनावश्यक खर्च' टाळण्यासाठी बनवला मास्टर प्लॅन
13
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
14
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
15
अंगावर शहारा आणणारी घटना! वादळात टीनशेडसोबत 'नन्हे मियाँ'ही उडाले अन्...; थरार कॅमेऱ्यात कैद -  बघा VIDEO
16
PM मोदींच्या आवाहनाला गडकरींचाही प्रतिसाद, बसने प्रवास करत केली पालखी महामार्गाच्या कामांची पाहणी; दौरा सुरू असतानाच...
17
PBKS vs MI : भावा कसा आहेस? रोहित शर्मा-श्रेयस अय्यरचा व्हिडिओ पाहिलात का?
18
Raj Thackeray : “२२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय?”, राज ठाकरेंचा सवाल
19
PCOS नाही, आता PMOS! ८ पैकी १ ‘या’ समस्येने त्रस्त; १७ कोटी महिलांच्या आरोग्यावर थेट परिणाम
20
नाशिक-पुणे, सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी बड्या तरतुदी मान्य; राज्य मंत्रिमंडळाचे १४ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार

By admin | Updated: May 12, 2014 00:58 IST

लग्नाचे आमिष दाखवून तब्बल ५ वर्षांपासून शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यानंतर लग्नास नकार मिळाल्याने पीडित तरुणीने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.

नागपूर : लग्नाचे आमिष दाखवून तब्बल ५ वर्षांपासून शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यानंतर लग्नास नकार मिळाल्याने पीडित तरुणीने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. या प्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धीरज पांडुरंग चिंचघरे (२६) रा. जैसाववाडी जुनी मंगळवारी, असे आरोपीचे नाव आहे. आरोपी धीरज ट्रॅव्हल्स एजन्सीमध्ये काम करतो. सूत्रांनुसार धीरज आणि २२ वर्षीय पीडित तरुणी एकाच शाळेत शिकत होते. शाळेतील मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. एकाच समाजातील असल्याने धीरजने तिला लग्नाचे आश्वासन दिले. दोघेही बाहेर फिरायला जाऊ लागले. यादरम्यान त्याने बाहेर आणि आपल्या घरी तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. पीडित मुलगी तेव्हा अल्पवयीन होती. त्यामुळे वयात आल्यावर लग्न करू, असे आश्वासन तो देत होता. गेल्या ५ वर्षांपासून हा प्रकार सुरू होता. गेल्या काही दिवसांपासून पीडित तरुणी धीरजला लग्नासाठी विचारू लागली. परंतु तो तिला टाळत होता. पीडितेने समाजातील काही प्रतिष्ठित लोकांना यासंदर्भात सांगितले. त्यांनी धीरजला समजावण्याचा प्रयत्न करीत पोलिसात तक्रार करण्याचा इशारासुद्धा दिला. परंतु त्याने लग्नास नकार दिला. तसेच न्यायालयातील अंतरिम जामीनसुद्धा घेऊन ठेवला. धीरजच्या या वागण्यामुळे दु:खी झालेल्या पीडित तरुणीने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. तिला तातडीने मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने तिचा जीव वाचला. पोलिसांनी याप्रकरणी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. पीडिता गरीब कुटुंबातील आहे. तिचे वडील अंध आहेत. कुटुंबात आईवडीलांसह एक लहान बहीण आहेत. धीरजचे वडील सेवानिवृत्त मनपा कर्मचारी आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे. (प्रतिनिधी)